सॅमसंगने आज जागतिक टेक मार्केटमध्ये आपला नवीन मोबाईल फोन Galaxy M35 5G लाँच केला आहे. 6,000mAh Battery ची पावर असलेला हा स्मार्टफोन Samsung Exynos 1380 प्रोसेसर वर चालतो. येत्या काही दिवसांमध्ये कंपनी या मोबाईलला भारतात पण लाँच करेल जो सध्या ब्राजील मध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. पुढे तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी एम 35 5 जी फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन वाचू शकता.
Samsung Galaxy M35 5G चे स्पेसिफिकेशन
- 6.6″ 120 हर्ट्झ सुपर अॅमोलेड स्क्रीन
- सॅमसंग एक्सीनोस 1380 प्रोसेसर
- 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
- 50 एमपी ट्रिपल रिअर कॅमेरा
- 13 एमपी सेल्फी कॅमेरा
- 25 वॉट 6,000 एमएएच बॅटरी
डिस्प्ले : Samsung Galaxy M35 5G फोन 1080 x 2340 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.6-इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीनवर लाँच झाला आहे. पंच-होल स्टाईल असणारा हा डिस्प्ले Super AMOLED वर बनला आहे जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालतो. या मोबाईलमध्ये 1000nits ब्राईटनेट मिळते.
प्रोसेसर : हा सॅमसंग स्मार्टफोन अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे जो One UI 6.1 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 5 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला सॅमसंगचा ही Exynos 1380 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.4GHz पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो.
मेमरी : ब्राजीलमध्ये Samsung Galaxy M35 5G फोन 8GB RAM वर लाँच झाला आहे. फोनमध्ये असलेली वचुर्अल रॅम याला 16 जीबी रॅम पर्यंत वाढविण्याची क्षमता ठेवतो. तसेच मोबाईलमध्ये युजर्सना 256GB Storage मिळेल ज्याला मेमरी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढविले जाऊ शकते.
कॅमेरा : फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम 35 5 जी फोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50MP OIS मेन सेन्सर आहे जो 8MP Ultra-wide अँगल लेन्स तसेच 2MP Macro सेन्सरसह मिळून चालतो. Samsung Galaxy M35 5G फोन 13MP Selfie Camera ला सपोर्ट करतो.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम 35 5 जी मध्ये मोठी 6,000mAh Battery देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनला 25W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह करण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की फुल चार्ज नंतर या फोनच्या स्पिकरवर तुम्ही 4 दिवसांपर्यंत ऑडियो गाणे ऐकू शकता.
इतर फिचर्स : Samsung M35 5G फोन NFC, Bluetooth 5.3 आणि 5GHz WiFi सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्सला सपोर्ट करतो. या मोबाईलमध्ये 13 5G Bands मिळतात तसेच सोबत Samsung Knox Vault आणि Dolby Atmos speakers सारखे चांगले पर्याय पण आहेत.
Samsung Galaxy M35 5G ची किंमत
सॅमसंगने आपल्या नवीन मोबाईल फोनला गॅलेक्सी एम 35 5 जी ला ब्राजीलमध्ये सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. यात 8GB RAM + 256GB Storage देण्यात आली आहे ज्याची किंमत R$2699 ब्राजीलियन रिअल आहे जी भारतीय चलनानुसार 43,500 रुपयांच्या आसपास आहे. हा मोबाईल भारतीय बाजारात पण आणला जाईल तसेच याची किंमत 35 हजाराच्या जवळपास ठेवली जाईल. ब्राजीलमध्ये Galaxy M35 5G फोन Dark Blue, Light Blue आणि Gray कलरमध्ये लाँच झाला आहे.















