भारतात Realme GT 6T चा सेल झाला सुरू, जाणून घ्या ऑफर आणि किंमत

रियलमीने गेल्या आठवड्यात भारतात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 6T लाँच केला आहे. ब्रँडने त्याचबरोबर भारतीय बाजारात एकदा परत जीटी सीरिजची सुरुवात केली आहे. डिव्हाईसमध्ये चांगली डिझाईन आणि कमी किंमतीत जबरदस्त स्पेसिफिकेशन मिळत आहेत. तसेच या नवीन मोबाईलचा सेल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर सुरु आहे. ज्यानुसार अनेक ऑफर मिळत आहेत. चला, पुढे किंमत, फिचर आणि ऑफरची माहिती जाणून घेऊया.

Realme GT 6T ची किंमत आणि ऑफर

  • नवीन मोबाईल Realme GT 6T ला चार स्टोरेज पर्यायामध्ये बाजारात आणले गेले आहे.
  • सर्व मॉडेलवर कंपनी ऑफर अंतर्गत 4,000 रुपयांचा इंस्टंट बँक डिस्काऊंट मिळत आहे.
  • बँक ऑफरसह 2,000 रुपयांचा एक्स्ट्रा एक्सचेंज बोनस पण मिळत आहे. म्हणजे की तुम्हाला कोणत्याही जुन्या फोनवर जर 4,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत असेल तर तो यावर एक्स्ट्रा 2,000 रुपये दिला जाईल.
  • डिव्हाईसच्या 8GB रॅम +128 जीबी ऑप्शनला बँक ऑफरसह फक्त 26,999 मध्ये विकत घेता येईल. मोबाईलच्या 8GB रॅम + 256 जीबी स्टोरेजची किंमत 28,999 रुपये आहे.
  • फोनचा तिसरा ऑप्शन 12 जीबी रॅम +256 जीबी स्टोरेज 31,999 रुपयांचा मिळेल. तसेच, टॉप मॉडेल 12 जीबी रॅम +512 जीबी स्टोरेज 35,999 रुपयांना मिळेल.
  • कलर ऑप्शन पाहता फ्लॅगशिप फोन Realme GT 6T फ्लूइड स्लिवर आणि रेजर ग्रीन सारखे दोन रंगामध्ये येतो.

Realme GT 6T चे स्पेसिफिकेशन

  • 6.78 अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 चिपसेट
  • 50 एमपी रिअर कॅमेरा
  • 32 एमपी सेल्फी कॅमेरा
  • 5,500 एमएएच बॅटरी
  • 120 वॉट फास्ट चार्जिंग

डिस्प्ले: Realme GT 6T मोबाईलमध्ये 6.78 इंचाचा 1.5K 8T LTPO अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे यावर 120Hz रिफ्रेश रेट, 6000 निट्स पर्यंत पीक ब्राईटनेस आणि 2160Hz पीडब्ल्यूएम डिमिंगला सपोर्ट मिळतो. त्याचबरोबर सुरक्षेसाठी 3 डी गोरिल्ला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शन लावले आहे.

प्रोसेसर: रियलमी जीटी 6 टी 5 जी स्मार्टफोन 4 नॅनोमीटरवर बनला क्वॉलकॉम Snapdragon 7+ Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह सादर झाला आहे. ज्यात 2.8Ghz पर्यंतच्या हाय क्लॉक स्पीड मिळते.

कॅमेरा: कॅमेरा फिचर्स पाहता मोबाईल ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह आहे. यात एफ/1.88 अपर्चर असलेला 50MP OIS SONY LYT 600 सेन्सर आणि एफ/2.2 अपर्चरसह 8MP SONY IMX355 अल्ट्रा वाईड लेन्स देण्यात आली आहे. तसेच, सेल्फीसाठी 32MP चा कॅमेरा आहे.

बॅटरी: realme GT 6T 5G फोनमध्ये 5,500mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. याला फास्ट चार्ज करण्यासाठी 120W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे.

इतर: रियलमी जीटी 6 टी स्मार्टफोनमध्ये चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी 9 5G बँड्स, WiFi 6 आणि Bluetooth 5.4 ची सुविधा आहे. हेच नाही तर पाणी आणि धूळीपासून वाचण्यासाठी IP65 रेटिंग आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here