सॅमसंग फॅन्ससाठी ऑगस्ट महिना खूप खास होता. एकाच आठवड्यात सॅमसंग ने एकीकडे आपला सर्वात ताकदवान नोट गॅलेक्सी नोट 9 लॉन्च केला होता तर कंपनी ने गॅलेक्सी टॅब एस4 आणि गॅलेक्सी टॅब ए 10.5-इंच प अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केले होते. गॅलेक्सी नोट 9 इंडियन मार्केट मध्ये सेल साठी उपलब्ध झाला आहे तर आज कंपनी ने गॅलेक्सी टॅब एस4 पण भारतात लॉन्च केला आहे.
सॅमसंग चा हा नवीन टॅबलेट डिवाईस 2 इन 1 एंडरॉयड टॅबलेट म्हणून समोर आला आहे. कंपनी ने यात ‘सॅमसंग डेएक्स’ फीचर दिला आहे ज्यामुळे हा टॅबलेट सोबतच लॅपटॉप म्हणून पण वापरता येईल. टॅब सोबत कीबोर्ड अटॅच करू शकता. डेएक्स फीचर मुळे विंडोज लॅपटॉप प्रमाणे यात पण एक साथ अनेक अॅप विंडोज ओपन करता येतात. तसेच यूएसबी पोर्ट द्वारा टॅब एस4 कोणत्याही मॉनिटरशी जोडता येतो.
गॅलेक्सी टॅब एस4 चे स्पेसिफिकेशन्स पाहता सॅमसंग ने हा नवीन डिवाईस 2560 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 10.5-इंचाच्या डब्ल्यूक्यूएक्सजीए सुपर एमोलेड डिस्प्ले सह सादर केला आहे. हा डिवाईस एंडरॉयड ओरियो आधारित आहे जो 2.35गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट वर चालतो. टॅब एस4 4जीबी रॅम सह 64जीबी आणि 256जीबी स्टोरेज वाल्या दोन वेरिएंट्स मध्ये सादर करण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज 400जीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टॅब एस4 च्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या डिवाईस मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच पावर बॅकअप साठी यात फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 7,300एमएएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग ने गॅलेक्सी टॅब एस4 सोबतचा ‘एस पेन’ पण खुप एडवांस केलाय आहे. या द्वारे मेमो व नोट्स लिहण्यासोबतच लोकेशन, डायरेक्शन व टेक्स्ट मेसेज पण लिहून सेव पण करता येतील तसेच सेंड पण करता येतील. सॅमसंग ने आपल्या या डिवाईस मध्ये ऐकेजी द्वारा ट्यून्ड 4 स्पीकर दिले आहेत जे डॉल्बी एटमॉस चा साउंड देतात.
सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 ब्लॅक आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो 57,900 रुपयांमध्ये देशात सेल साठी उपलब्ध होईल. हा डिवाईस आज पासून सॅमसंग वेबसाइट आणि आॅफिशियल रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध झाला आहे. तसेच 20 ऑगस्ट पासून गॅलेक्सी टॅब एस4 अमेझॉन इंडिया वरून पण एक्लूसिव विकत घेता येईल. एचडीएफसी क्रेडिट कार्ड ग्राहक गॅलेक्सी टॅब एस4 च्या खरेदीवर 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकतील.
















