Nothing चा CMF Phone 1 कसा असेल? पाहा लीक झालेला फोटो आणि स्पेसिफिकेशन

वेगळी डिझाईन असणारा स्मार्टफोन आणणारी कंपनी Nothing कंपनीचा नवीन CMF Phone 1 वर काम करत आहे ज्याला घेऊन काही दिवसांमध्ये अनेक लीक समोर आले आहेत. तसेच आज या मोबाईलचा फोटो आणि स्पेसिफिकेशन इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. सीएमएफ फोन 1 मध्ये काय मिळू शकते तसेच याचा लूक व डिझाईन कसे असतील? ही सर्व लीक माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

CMF Phone 1 किंमत

सीएमएफ फोन 1 एक मिड बजेट मोबाईल असेल ज्याला जागतिक मार्केटमध्ये जवळपास 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केले जाऊ शकते. लीकमध्ये या स्मार्टफोनची यूएस किंमत समोर आली आहे जी $249 डॉलर सांगण्यात आली आहे. हा किंमत भारतीय चलनानुसार 20,770 रुपयांच्या आसपास आहे. आशा करू शकता की भारतात CMF Phone 1 ची प्रारंभिक किंमत 15,999 रुपये असू शकते ज्यात 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मिळेल.

CMF Phone 1 चे स्पेसिफिकेशन

  • 6.6″ 120 हर्ट्झ ओएलईडी डिस्प्ले
  • मीडियाटेक डायमेंसिटी 7200
  • 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
  • 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
  • 33 वॉट 5,000 एमएएच बॅटरी

डिस्प्ले : सीएमएफ फोन 1 ला 6.67 इंचाच्या FHD+ डिस्प्लेवर लाँच केले जाऊ शकते. समोर आलेल्या लीकनुसार ही स्क्रीन OLED पॅनलवर बनली आहे जी 120Hz रिफ्रेश रेटवर काम करेल. फोटोमध्ये दिसत आहे की हा मोबाईल वॉटरड्रॉप नॉच असलेला असेल.

प्रोसेसर : Nothing CMF Phone 1 अँड्रॉईड 14 वर लाँच केला जाऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला MediaTek Dimensity 7200 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाणार असल्याची गोष्ट समोर येत आहे जो 2.8GHz क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो.

मेमरी : सीएमएफ फोन 1 ला नथिंगद्वारे दोन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये आणले जाऊ शकते. लीकनुसार हा मोबाईल फोन 8 जीबी रॅमला सपोर्ट करेल ज्याच्यासोबत 128 जीबी स्टोरेज तसेच 256 जीबी स्टोरेज मिळेल. यात वचुर्अल रॅम दिली जाईल की नाही, याची माहिती अजून मिळाली नाही.

कॅमेरा : प्रदीर्घ काळानंतर कोणताही स्मार्टफोन सिंगल रियर कॅमेरासह लॉन्च होईल. CMF फोन 1 च्या मागील पॅनलमध्ये सिंगल कॅमेरा सेन्सर दिला जाईल जो लीकनुसार 50 मेगापिक्सेल असेल. फ्रंट पॅनल 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी Nothing च्या CMF Phone 1 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh Battery दिली जाणार असल्याची गोष्ट लीकमध्ये समोर आली आहे. तसेच बॅटरीला फास्ट चार्ज करण्यासाठी या मोबाईलमध्ये 33W फास्ट चा​र्जिंग पाहायला मिळू शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here