OnePlus ने एप्रिल महिन्यात Nord CE 4 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. तसेच आता त्याचा लो व्हर्जन OnePlus Nord CE 4 Lite आणला जाऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की या फोनच्या संदर्भात काही लीक समोर आल्या होत्या, पण ताज्या अपडेटनुसार त्याचे लाईव्ह फोटो आणि बेंचमार्किंग स्कोअर समोर आले आहेत. या मोबाईलला पुढील महिन्यात एंट्री दिली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. चला आपण पुढे याची नवीनतम गीकबेंच सूची आणि लीक झालेल्या फोटोबद्दल तपशीलवार माहिती घेऊया.
OnePlus Nord CE 4 Lite लाईव्ह फोटो (लीक)
- OnePlus Nord CE 4 Lite चा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर टिपस्टर संजू चौधरीने शेअर केला आहे.
तुम्ही खालील फोटोत पाहू शकता की, या फोनमध्ये ड्युअल रिअल कॅमेरा सेटअप आणि व्हर्टिकल सेटअपमध्ये ड्युअल एलईडी फ्लॅश आहे. - मोबाईलच्या मागील पॅनलवर 50 मेगापिक्सेल कॅमेरा मिळण्याची माहिती देखील पाहता येईल.
- डिव्हाईसच्या मध्यभागी कंपनीचे ब्रँडिंग आणि खाली मॉडेल क्रमांक CPH2621 छापण्यात आला आहे.
- डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, या फोनला फ्लॅट साईड आणि राऊंड एज असल्याचे दिसून येते. त्याच्या मागील पॅनलवर ग्लास फिनिश आहे. तर हा डिव्हाईस सिल्व्हर रंगाचा असल्यासारखा दिसत आहे.
- लीकमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, OnePlus Nord CE 4 Lite 5G पुढील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
OnePlus Nord CE 4 Lite गीकबेंच सूची
- गीकबेंच सूचीनुसार, या डिव्हाईसने सिंगल कोअर राऊंडमध्ये 896 पॉइंट आणि मल्टी कोर राऊंडमध्ये 2002 पॉइंट मिळवले आहेत.
- मोबाईलच्या CPU मध्ये दोन क्लस्टर आहेत जे 6 कोरसह 1.80 गीगाहर्ट्झ आणि 2 कोरसह 2.21 गीगाहर्ट्झचा क्लॉक स्पीड दर्शविते. असे दिसत आहे की, यात स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर असू शकतो.
- अधिक चांगल्या ग्राफिक्ससाठी चिपसेटमध्ये ॲड्रेनो 619 GPU दिला जाऊ शकतो.
- डिव्हाईसमध्ये 7.19GB RAM असल्याचे दिसते. परंतु लाँचच्या वेळी सुमारे 8GB पर्यंत दिले जाऊ शकते.
- ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा मोबाईल Android 14 वर आधारित असल्याचे सांगितले जाते.
OnePlus Nord CE 4 Lite चे स्पेसिफिकेशन (अपेक्षित)
- डिस्प्ले: OnePlus Nord CE 4 Lite 5G फोनमध्ये 2400 × 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67 इंचाचा FHD+ ॲमोलेड डिस्प्ले असू शकतो. याला 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200nits ब्राईटनेस दिला जाऊ शकतो.
- स्टोरेज: हा फोन दोन स्टोरेजमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ज्यामध्ये 8GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 256GB असे मेमरी पर्याय असू शकतात.
- कॅमेरा: OnePlus Nord CE 4 Lite 5G फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सेल प्रायमरी आणि 2MP डेप्थ लेन्स मिळू शकतात. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
- बॅटरी: OnePlus Nord CE 4 Lite 5G या फोनमध्ये 5,500mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. ती चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 80 वॅट फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान दिले जाऊ शकते.
















