Realme Q सीरीज मध्ये लॉन्च होतील नवीन स्मार्टफोन, 5 सप्टेंबरला येईल समोर

चिनी कंपनी रियलमीने आज भारतात जगातील पहिला 64-मेगापिक्सल क्वाड कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme XT सादर केला आहे. तसेच आता बातमी समोर आली आहे कि Realme 5 सप्टेंबरला आपल्या नवीन Q सीरीज मध्ये स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

रियलमीने काही दिवसांपूर्वी एक टीजर सादर केला होता, ज्यात एका अंड्यात डायनासोर दिसत होता. अलीकडे Weibo अकाउंट मध्ये एक दुसरा टीजर सादर केला गेला, ज्यात ‘क्वीन’ प्लेइंग कार्ड दाखवण्यात आला होता. यात क्वीनचा Q दिसत होता. तर आता कंपनीने अजून एक टीजर प्रसिद्ध करून स्पष्ट केले आहे कि कंपनी आपले नवीन फोन्स Q सीरीज मध्ये सादर करेल.

टीजर इमेज मध्ये 5 सप्टेंबरच्या रिलीज डेटचा पण खुलासा झाला आहे. म्हणजे Q सीरीजचे स्मार्टफोन्स 5 सप्टेंबरला लॉन्च केले जातील. टीजर मध्ये फोनची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. पण ‘क्वीन’ प्लेइंग कार्डच्या टीजर पोस्टर मध्ये 119 नंबर देण्यात आला होता. यावरून समजते कि या स्मार्टफोन मध्ये F/2.2 अर्परचर सह 119 डिग्री FoV सुपर-वाइड-अँगल कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Realme XT स्पेसिफिकेशन्स

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता Realme XT 6.4-इंचाच्या सुपर एमोलेड ड्यूड्रॉप नॉचला सपोर्ट करतो. हा फोन ग्लॉस बॉडी वर बनला आहे ज्याच्या सुरक्षेसाठी कंपनीने Realme XT च्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची कोटिंग आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला गेला आहे ज्यात प्रोसेसिंग साठी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 712 एआई चिपसेट देण्यात आला आहे.

Realme ने भारतात Realme XT स्मार्टफोन तीन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे. फोनचा सर्वात छोटा वेरिएंट 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे तसेच हा वेरिएंट पण 64जीबी इंटरनल स्टोरेज सह येतो. त्याचप्रमाणे Realme XT चा सर्वात मोठा वेरिएंट कंपनीने 8जीबी रॅम मेमरी वर सादर केला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Realme XT डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. अशाप्रकारे पावर बॅकअप साठी हा स्मार्टफोन 20वॉट चार्जिंगला सपोर्ट आणि VOOC 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो जी यूएसबी टाईप-सी ने चार्ज करता येईल.

सोर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here