पोको येत्या काही आठवड्यांमध्ये आपल्या M6 सीरीजचा विस्तार करू शकतो. यानुसार नवीन मॉडेल POCO M6 Plus 5G भारतासह ग्लोबल बाजारात एंट्री घेईल. परंतु अजून ब्रँडकडून कोणतीही घोषणा झाली नाही, याआधी डिव्हाईस बेंचमार्किंग वेबसाईट गीकबेंचवर प्रमुख स्पेसिफिकेशनसह स्पॉट करण्यात आला आहे. ज्याची माहिती तुम्ही या पोस्टमध्ये पाहू शकता.
POCO M6 Plus 5G गीकबेंच लिस्टिंग
- आगामी POCO स्मार्टफोनला 24066PC95I मॉडेल नंबरसह गीकबेंच डेटाबेसवर जागा मिळाली आहे.
- लिस्टिंगवरून माहिती मिळाली आहे की POCO M6 Plus 5G ने सिंगल-कोर मध्ये 967 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 2281 अंक मिळवले आहेत.
- डिव्हाईसमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळण्याची चर्चा आहे. ज्याचे क्लॉक स्पीड 2.3GHz असू शकते. यात Adreno 613 GPU पण जोडला जाऊ शकतो.
- वरती सांगितल्या माहितीनुसार नवीन पोको फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट असलेला असू शकतो.
- मोबाईलमध्ये जवळपास 6GB रॅम दिली जाऊ शकते. तर लाँचच्या वेळी आणि पण व्हेरिएंट येऊ शकतात.
- POCO M6 Plus 5G स्मार्टफोन अँड्रॉईड 14 आणि हायपर ओएसवर आधारित असण्याची संभावना आहे.
POCO M6 Plus 5G चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)
POCO M6 Plus 5G चीनमध्ये सादर केलेल्या रेडमी नोट 13 आर चे रिब्रँड व्हर्जन असू शकते. फोनचे संभावित स्पेक्स पुढे दिलेल्या माहिती सारखे असण्याची संभावना आहे.
- डिस्प्ले: रेडमी नोट 13 आर स्मार्टफोनमध्ये 6.79 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. यावर एचडी प्लस रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 550 निट्स पीक ब्राईटनेस देण्यात आली आहे.
- प्रोसेसर: फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट मिळतो. तर ग्राफिक्ससाठी एड्रिनो 613 जीपीयू लावला आहे.
- स्टोरेज: मेमरीसाठी रेडमी नोट 13 आर मध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे.
- कॅमेरा: Redmi Note 13R ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप लाँच झाला होता. यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलची लेन्स मिळतो.
- बॅटरी: Redmi Note 13R मध्ये 5030mAh ची मोठी बॅटरी आणि 33 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.















