तुमचा Xiaomi फोन बनावट तर नाही ना? फसवणूक होण्याआधी अशी करून घ्या खात्री

Xiaomi भारतातील नंबर वन स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. आणि जेव्हा एखादा ब्रँड नंबर वन बनतो तेव्हा त्याची नक्कल करण्याचे प्रयत्न केले जातात आणि या ब्रँडच्या नावाचे बनवत फोन देखील बनवले जातात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे बनावट फोन अस्सल फोन्स सारखेच दिसतात आणि वापरताना देखील फरक जाणवत नाही. तुम्हाला फेसबुक किंमत गुगलवर अत्यंत कमी किंमतीत स्मार्टफोन उपलब्ध असल्याची जाहिरात दिसते. किंमत पाहून तुम्ही मागचा-पुढचा कोणताही विचार न करता तो फोन विकत घेता. परंतु तो हँडसेट अस्सल असेल की नाही असा प्रश्न कोणालाही पडत नाही. अशी फसवणूक ऑफलाइन स्टोर्समध्ये देखील केली जाते. इथे देखील अनेक स्टोर्सवर बनावट फोन उपलब्ध असतात. त्यामुळे जर फोन विकत घेताना तुम्हाला थोडा देखील संशय येत असेल तर तुम्ही सहज तो अस्सल आहे की बनावट चेक करू शकता. Xiaomi नं आपल्या युजर्ससाठी खास सुविधा दिली आहे जिथे तुम्ही तुमच्याकडे असलेला Xiaomi फोन देखील अस्सल आहे का ते चेक करू शकता.

बनावट फोन कशाप्रकारे ओळखायचा

तुम्ही शाओमी मोबाईल फोनची खरेदी ऑनलाईन केली असेल तर नंतर छडा लावू शकता की तो अस्सल आहे कि बनावट. इतकेच नव्हे तर ऑफलाईन स्टोरमध्ये विकल्या जाणाऱ्या शाओमीच्या प्रोडक्टच्या अस्सलपणाची खात्री देखील ते विकत घेण्याआधी करून घेता येईल. फोन अस्सल आहे की बनावट ते तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं जाणून घेऊ शकता. यासाठी:

1. सर्वप्रथम तुम्हाला शाओमीच्या साईटवर जावे लागेल आणि इथे व्हेरिफाय ऑप्शनची निवड करा. इथे क्लिक करून या लिंकवर जाऊ शकता.

2. इथे तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील. पहिला शाओमी प्रोडक्ट ऑथेंटिकेशन आणि दुसरा व्हेरिफाय माय मोबाईलचा. मोबाईलसाठी व्हेरिफाय माय मोबाईलचा पर्याय निवडा.

3. इथे क्लिक करताच खाली काही ऑप्शन मिळतील. पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमच्या फोनचा आयएमआय नंबर टाकावा लागेल. तर दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला सीरियल नंबर टाकायचा आहे.

4. तसेच पेजवर एक सिक्योरिटी कोड मिळेल जो टाकून व्हेरिफाय करताच तुम्हाला तुमचा फोन अस्सल आहे कि बनावट ते समजेल.

जर तुमचा फोन अस्सल असेल तर तुमच्या फोनच्या मॉडेल नंबरची माहिती समोर येईल अन्यथा चुकीचा नंबर असल्याचं सांगण्यात येईल. अशाप्रकारे तुम्ही तुमचा फोन अस्सल आहे की नाही ते जाणून घेऊ शकता. तुमच्या फोनचा आयएमआय नंबर आणि सीरियल नंबर फोनच्या बॉक्सच्या मागे असेल. तसेच फोनच्या सेटिंगमध्ये देखील हे नंबर्स मिळतील.

मोबाईल अ‍ॅक्सेसरीजची सत्यता जाणून घ्या

जर तुम्ही शाओमीची पावर बँक, ईयरफोन किंवा इतर कोणताही डिवाइस घेतला असेल तर त्यांची देखील सत्यात जाणून घेऊ शकता.

1. शाओमीच्या व्हेरिफाय पेजवर शाओमी प्रोडक्ट ऑथेंटिकेशन आणि व्हेरिफाय माय मोबाईलच्या ऑप्शनमधून शाओमी प्रोडक्ट ऑथेंटिकेशन पर्याय निवडा.

2. इथे खाली तुम्हाला 20 अंकी सिक्योरिटी कोड टाकावा लागेल. सिक्योरिटी कोड तुमच्या अ‍ॅक्सेसरीज बॉक्सवर असेल.

3. तो टाकल्यानंतर खाली चार अंकी सिक्योरिटी कोड मिळेल तो टाकून व्हेरिफाय करताच तुमच्या प्रोडक्टच्या मॉडेल नंबरसह अन्य माहिती समोर येईल.

अशाप्रकारे तुम्ही शाओमी डिवाइसच्या सत्यतेची खात्री करून घेऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here