भारतात एचएमडी फोनची सुरुवात झाली आहे तसेच कंपनीने दोन फिचर फोन HMD 105 आणि HMD 110 भारतात लाँच केले आहेत. याव्यतिरिक्त एचएमडी स्मार्टफोन पण लीकमध्ये समोर आला आहे. ज्याचे नाव HMD Ridge सांगण्यात आले आहे. ब्रँडची घोषणा होण्याच्या आधीच मोबाईल फोनचा फोटो आणि स्पेसिफिकेशन इंटरनेटवर शेअर झाले आहेत ज्याला तुम्ही पुढे वाचू शकता.
HMD Ridge चे डिझाईन (लीक)
लीकनुसार HMD Ridge स्मार्टफोन प्लास्टिक फ्रेमवर बनविला जाईल तसेच फ्रंट पॅनलवर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ची लेअर असेल. समोर आलेल्या फोटोवरून समजले आहे की फोनमध्ये पंच-होल स्टाईल स्क्रीन मिळेल ज्याला बेजल नसतील. तसेच बॅक पॅनलवर वरती डावीकडे रेक्टेंगुलर कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल ज्यात दोन कॅमेरा कॅमेरा लेन्स आणि एक फ्लॅश असेल. लीक फोटोमध्ये या आगामी एचएमडी फोनला गुलाबी (pink) कलरमध्ये दाखविण्यात आले आहे.
HMD Ridge चे स्पेसिफिकेशन (लीक)
- 6.64″ फुलएचडी+ 90 हर्ट्झ डिस्प्ले
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480+
- 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
- 50 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
- 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- 5,000 एमएएच बॅटरी
डिस्प्ले : लीकनुसार HMD Ridge स्मार्टफोन 6.64 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेवर लाँच केला जाईल. ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर काम करेल.
प्रोसेसर : HMD Ridge अँड्रॉईड 14 ओएसवर लाँच होईल. प्रोसेसिंगसाठी यात Qualcomm Snapdragon 480 Plus ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो जो 2.2GHz क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो. तसेच ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो 619 जीपीयू आहे.
मेमरी : लीकनुसार हा आगामी एचएमडी 5 जी फोन तीन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. या मोबाईलला 4GB, 6GB तसेच 8GB RAM वर सादर केले जाऊ शकते ज्यामध्ये 128GB तसेच 256GB Storage पर्याय पाहायला मिळू शकतात.
कॅमेरा : फोटोग्राफीसाठी HMD Ridge 5G फोन ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल मेन सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या एचएमडी मोबाईलमध्ये 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
बॅटरी : HMD Ridge 5G फोनला पावर बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरीसह बाजारात आणले जाऊ शकते. सध्या लीकमध्ये फोनमध्ये दिली जाणारी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीची माहिती समोर आली नाही.















