ओप्पोचा Satellite Edition स्मार्टफोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

मोबाईल निर्माता ओप्पोच्या सॅटेलाइट एडिशन स्मार्टफोनची चर्चा खूप दिवसांपासून चालली होती. ब्रँडने ही प्रतीक्षा संपवत युजर्ससाठी Oppo Find X7 Ultra Satellite Edition होम मार्केट चीनमध्ये लाँच केला आहे. हा डिव्हाईस फाइंड एक्स 7 सीरिज अंतर्गत आणला गेला आहे. यात पहिले दोन स्मार्टफोन लाँच केले होते. तसेच, आता सॅटेलाइट टेक्नॉलॉजीसह मोबाईलची एंट्री झाली आहे. चला, पुढे याची किंमत, स्पेसिफिकेशन आणि इतर माहिती जाणून घेऊया.

Oppo Find X7 Ultra Satellite Edition मध्ये काय आहे खास

  • फोनच्या नावाने तुम्ही समजू शकता की Oppo Find X7 Ultra Satellite Edition मध्ये सेटेलाइटच्या मदतीने जोडण्याची सुविधा आहे. म्हणजे की तुम्ही नेटवर्क नसेल तर सिग्नल आल्यावर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सॅटेलाइटच्या मदतीने कनेक्ट करू शकता.
  • ही सुविधा यशस्वी बनविण्यासाठी ब्रँडने मोबाईलमध्ये अँटीनाचा वापर केला आहे. ज्यामुळे दोन बाजूने सॅटेलाईट कॉल केला जाऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही मेसेज पण पाठवू शकता .

Oppo Find X7 Ultra Satellite Edition ची किंमत

  • ओप्पो फाइंड X7 अल्ट्रा सॅटेलाईट एडिशनला ब्रँडने चीनच्या वेबसाईटवर सिंगल स्टोरेज ऑप्शनमध्ये लिस्ट केले आहे.
  • हा फोन 16GB रॅम + 1TB स्टोरेजसह 7,499 युआन म्हणजे भारतीय चलनानुसार 86,562 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.
  • फोनचा सेल येत्या 2 एप्रिलपासून चीनच्या ओप्पो वेबसाईट आणि JD.com वर होणार आहे.

Oppo Find X7 Ultra Satellite Edition चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Oppo Find X7 Ultra Satellite Edition फोनमध्ये 6.82-इंचाचा कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर जबरदस्त 3168×1440 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेटला सपोर्ट मिळतो.
    cप्रोसेसर: या नवीन सॅटेलाईट एडिशन फोनमध्ये ब्रँडने एक्स 7 अल्ट्रा प्रमाणे क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसर लावला आहे.
  • मेमोरी: स्टोरेजच्या बाबतीत हा सॅटेलाईट एडिशन व्हर्जन 16 जीबी पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1टीबी पर्यंत UFS 4.0 इंटरनल स्टोरेज प्रदान करतो.
  • बॅटरी: Oppo Find X7 Ultra Satellite Edition डिव्हाईसला पावर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी आहे जी 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे.
  • रिअर कॅमेरा: ओप्पो फाइंड एक्स7 अल्ट्रा सॅटेलाईट एडिशनमध्ये तुम्हाला क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 1-इंचाचा मोठा सेन्सर आणि f/1.8 अपर्चरसह 50MP चा वाईड-अँगल कॅमेरा, 65mm फोकल लेंथ आणि f/2.6 अपर्चर असलेला 50MP चा टेलीफोटो लेन्स, 135mm फोकल लेंथ आणि f/4.3 अपर्चरसह 50MP चा सुपर टेलीफोटो लेन्स आणि f/2.0 अपर्चर असलेला 50MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे.
  • फ्रंट कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी नवीन Satellite Edition ओप्पो फोनमध्ये f/2.4 अपर्चर असलेला 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here