सर्वांना माहित आहे की Jio, Airtel आणि Vi ने त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. या तिन्ही खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती 600 रुपयांनी वाढवल्या आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का की अजूनही एक टेलिकॉम ऑपरेटर आहे, ज्यांच्या प्लॅनच्या किमती वाढलेल्या नाहीत. होय, आम्ही BSNL बद्दल बोलत आहोत जे अजूनही जुन्या किमतींवर रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. हे लक्षात घेऊन, आज आम्ही BSNL च्या 28 दिवसांची वैधता असलेल्या रिचार्ज प्लॅनची माहिती देणार आहोत.
बीएसएनएल चा 139 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलचा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या पॅकमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि स्थानिक, एसटीडी आणि राष्ट्रीय रोमिंग सुविधा मिळत आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा आणि रोज 100 एसएमएस मिळतात.
बीएसएनएलचा 184 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलच्या 184 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. यात 1GB डेटासह दररोज 100 एसएमएस यांचा फायदा मिळतो. या बीएसएनएल प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल्स देखील मिळत आहे. याशिवाय, तुम्हाला Lystn पॉडकास्टचे मोफत सबस्क्रीप्शन मिळेल.
बीएसएनएलचा 185 रुपयांचा प्लॅन
हा 185 रुपयांचा बीएसएनएल प्रीपेड प्लॅन 28 दिवसांची वैधता देतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. हा प्लॅन वैधतेच्या संपूर्ण कालावधीसाठी 100 एसएमएस प्रदान करतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा देखील येतो. याशिवाय, तुम्हाला एम/एस ऑनमोबाईल ग्लोबल लिमिटेड आणि बीएसएनएल ट्यून्स द्वारे प्रोग्रेसिव वेब एपीपी (पीडब्ल्यूए) वर चॅलेंज एरिना मोबाईल गेमिंग सेवेचे बंडलिंग देखील मिळते.
बीएसएनएलचा 186 रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलचा 186 रुपयांचा प्रीपेड प्लॅन अनेक मनोरंजक फायदे आणि सेवांसह येतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. तसेच, यात लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंगसाठी अमर्यादित व्हॉईस कॉल यांचा फायदा मिळतो. प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा सोबतच 100 एसएमएस च्या लाभांसह येतो. या पॅकमध्ये मोफत बीएसएनएल ट्यूनसह हार्डी गेम्स ची सुविधा देण्यात येते.
बीएसएनएलचा 187 रुपयांचा प्लॅन
या बीएसएनएल पॅकमध्ये दररोज 2GB डेटा आणि 28 दिवसांची वैधता मिळते. या प्रीपेड प्लॅनमध्ये मोफत पीआरबीटी सह दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. हा मुंबई आणि दिल्लीतील एमटीएनएल नेटवर्कसह होम एलएसए आणि नॅशनल रोमिंगमधील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉल (स्थानिक/STD) सोबत येतो.














