BGMI Unban: PUBG च्या इंडिया व्हेरिएंटचं होणार दणक्यात पुनरागमन, लोकप्रिय युट्युबरनं केला दावा

bgmi

बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) वरील बंदी हटवण्याबाबत सकारात्मक बातमी समोर आली आहे. लोकपोरीया युट्युब चॅनल टेक्निकल गुरुजी (Technical Guruji) च्या गौरव चौधरीनं एक व्हिडीओ शेयर करून सांगितलं आहे की बीजीएमआय गेमचं भारतात पुनरागमन साल 2022 च्या शेवट्पर्यंत होऊ शकतं. Battlegrounds Mobile India (BGMI) गेमवर भारत सरकारनं जुलै 2022 मध्ये बंदी घातली होती. तेव्हापासून हा गेम Apple App Store आणि Google App Store वर उपलब्ध झालेला नाही. Krafton चा बॅटल रोयाल गेम बॅन होऊन चार महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे चाहते हा गेम पुन्हा खेळण्याची आतुरतेने वाट बघत आहेत.

BGMI unban: टेक्निकल गुरुजीनं दिली माहिती

टेक्निकल गुरुजीच्या युट्युब व्हिडीओ सीरीज – WTF (Weekly Tech Focus) च्या 12व्या भागात गौरव चौधरीनं अनेक टॉपिक जसे की – ट्रंपचा ट्विटरवर पुनरागमन, जीबी व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम (GB WhatsApp Scam) आणि iPhone 14 क्रॅश डिटेक्शनची माहिती दिली आहे. तसेच या व्हिडीओमध्ये त्याने बीजीएमआयच्या पुनरागमनावर देखील सविस्तर माहिती दिली आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची डोकेदुखी वाढवण्यासाठी Moto E22s ची एंट्री; अत्यंत कमी किंमतीत दमदार फीचर्स

या व्हिडीओ मध्ये टेक्निकल गुरुजीनं सांगितलं आहे की “आपण सर्व अनेक महिने बॅटलग्राउंड मोबाइल इंडियाच्या पुनरागमनाची वाट बघत आहात आणि आता आमच्याकडे एक तारीख आहे. पबजीचा इंडिया व्हेरिएंट बीजीएमआय गेम साल 2022 च्या शेवट्पर्यंत एका नवीन अवतारात पुनरागमन करू शकतो. तसेच गौरवनं आपल्या व्हिडीओमध्ये क्राफ्टन इंडियाचे हेड ऑफ कॉर्प डेव अँड इन्वेस्टमेंट्स (India & MENA) अनुज टंडन यांच्या जाण्याची माहिती देखील माहिती शेयर केली आहे. परंतु त्याने अनुज यांच्या राजीनाम्याबाबत कोणताही अंदाज लावला नाही.

ई-स्पोर्ट्स प्लेयरनं दिली माहिती

याआधी भारतातील लोकप्रिय ई-स्पोर्ट्स प्लेयर पीयूष स्पेरो बथलानं बीजीएमआयच्या भारतातील पुनरागमनाबद्दल माहिती शेयर केली आहे. त्याने आपल्या लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान सांगतील आहे की त्याचे मते क्राफ्टन लवकरच भारतात बीजीएमआय पुन्हा लाँच करू शकतं. हे देखील वाचा: मोबाइलच्या जागी साबणाच्या वड्या मिळू नये यासाठी काय करावं? Online Shopping करताना ‘या’ टिप्स फॉलो करा

पीयूषनुसार, सरकार आणि क्राफ्टन दरम्यान सुरु असलेल्या मीटिंगबद्दल सध्या कोणतीही खास बातमी समोर आली नाही, त्यामुळे आपण सतर्क राहील पाहिजे. या लाइव्ह स्ट्रीममध्ये तो पुढे म्हणाला की बीजीएमआयचे भारतात पुनरागमन डिसेंबर 2022 पर्यंत होऊ शकतं.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here