सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीसह Xiaomi MIX Fold 4 झाला 3C साईटवर लिस्ट, जाणून घ्या माहिती

शाओमी मागच्या अनेक दिवसांपासून आपल्या प्रीमियम फोल्ड आणि फ्लिप स्मार्टफोनवर काम करत आहे. सांगण्यात आले आहे की यावर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये ब्रँड Xiaomi MIX Fold 4 ला चीनमध्ये लाँच करेल. तसेच, सादर होण्याच्या आधी याला 3 सी सर्टिफिकेशन वेबसाईटवर स्पॉट करण्यात आले आहे. फोनमध्ये सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी असण्याची माहिती मिळाली आहे. चला, पुढे लिस्टिंगला सविस्तर जाणून घेूऊया.

Xiaomi MIX Fold 4 3 सी लिस्टिंग

  • माय स्मार्ट प्राईसने 3C सर्टिफिकेशन डेटाबेसवर मॉडेलनंबर 24072PX77C सह एका आगामी Xiaomi स्मार्टफोनला स्पॉट केले आहे.
  • लिस्टिंगवरून माहिती मिळाली आहे की यात सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीला सपोर्ट मिळेल. यामुळे हा Xiaomi MIX Fold 4 असण्याची शक्यता आहे.
  • Xiaomi MIX Fold 4 मध्ये 67W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळण्याची गोष्ट पण समोर आली आहे.
  • 3 सी साईटवर मॉडेल नंबर MDY-15-EQ असणाऱ्या चार्जर वापर टेस्टिंगसाठी झाला आहे हा चार्जर 15W (5V/3A) आणि 67W (20V/3.25A) फास्ट चार्जिंग असलेला आहे.
  • मॉडेल नंबर आणि बॅटरी चार्जिंग व्यतिरिक्त लिस्टिंगमध्ये फोल्डेबल डिव्हाईस बाबत इतर कोणतीही माहिती मिळाली नाही.

Xiaomi MIX Fold 4 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • गेल्या महिन्यात आलेल्या लीकनुसार Xiaomi MIX Fold 4, HONOR Magic V2 पेक्षा पातळ असेल. जो वर्तमान मध्ये सर्वात पातळ फोल्डेबल आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की नवीन मिक्स फोल्ड 4 लाँच झाल्यानंतर सर्वात पातळ फोल्डेबल बनू शकतो.
  • Xiaomi MIX Fold 4 ला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसरसह सादर होण्याची माहिती समोर आली आहे.
  • मोबाईलमध्ये 1/1.55-इंचाचा सेन्सर आकार आणि ऑप्टिकल फोटो स्टेबिलायजेशन सह 50MP चा रिअर कॅमेरा असण्याची संभावना आहे. हेच नाही तर यात 60MP 2x टेलीफोटो कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 10MP 5x पेरिस्कोप कॅमेरा पण दिला जाऊ शकतो.
  • Xiaomi MIX Fold 4 कथितरित्या IP रेटिंग असलेला कंपनीचा पहिला फोल्डेबल असू शकतो.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here