मोटोरोलाने भारतीय बाजारात आपल्या फ्लिप स्मार्टफोन पोर्टफोलियोला पुढे वाढविले आहे. यानुसार Motorola razr 50 Ultra लाँच झाला आहे. मोबाईलमध्ये ब्रँडने 4 इंचाचा आऊटर डिस्प्ले, 165Hz रिफ्रेश रेट, 12 जीबी पर्यंत रॅम, 4000mAh बॅटरी, 45 वॉट फास्ट चार्जिंग सारखे अनेक जबरदस्त स्पेसिफिकेशन दिले आहेत. तसेच, याची सेल ई-कॉमर्स साईट अॅमेझॉन, कंपनी वेबसाईट आणि इतर रिटेल आऊटलेटवर सुरु होईल. चला, पुढे डिव्हाईसची किंमत आणि संपूर्ण फिचर्स सविस्तर जाणून घेऊया.
Motorola razr 50 Ultra ची किंमत आणि उपलब्धता
मोटोरोलाने नवीन फ्लिप स्मार्टफोन razr 50 Ultra ला 89,999 रुपयांच्या लाँचवर सादर केले आहे. यात 10,000 रुपयांची बँक ऑफर पण आहे.
डिव्हाईसची प्री बुकिंग 10 जुलैपासून सुरु होईल. फोनसह 9,999 रुपयांचे मोटो बड्स प्लस फ्री दिले जाणार आहेत.
razr 50 Ultra साठी युजर्सना पीच फज, स्प्रिंग ग्रीन आणि मिडनाइट ब्लू सारखे तीन कलर मिळतील.
हा फोन अॅमेझॉन, कंपनी वेबसाईट आणि इतर रिटेल आऊटलेवर उपलब्घ होईल.
Motorola razr 50 Ultra चे स्पेसिफिकेशन
डिस्प्ले
- मेन डिस्प्ले: 6.9 इंचाचा LTPO FHD+ pOLED डिस्प्ले
- रिफ्रेश रेट: 165Hz
- ब्राईटनेस: 3000 निट्स तक
- कव्हर डिस्प्ले: 4 इंचाचा LTPO pOLED डिस्प्ले
- रिफ्रेश रेट: 165Hz
- प्रोटेक्शन: कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस
Motorola razr 50 ultra मध्ये 6.9-इंचाचा FHD+ pOLED LTPO मेन डिस्प्ले देण्यात आला आहे यावर 165Hz रिफ्रेश रेट, 2640×1080 पिक्सल रिजॉल्यूशन, 10-बिट HDR 10+, 100% DCI-P3 कलर गॅमट, 3000 निट्स पर्यंत पीक ब्राईटनेस सादर करण्यात आले आहे. तर फोन 4 इंचाचा pOLED LTPO आऊटर स्क्रीनसह आहे. यावर पण 165Hz रिफ्रेश रेट, 1272×1080 पिक्सल रिजॉल्यूशन, 100% DCI-P3 कलर गॅमटला सपोर्ट मिळतो. हेच नाही तर स्क्रीनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन लावण्यात आले आहे.
परफॉर्मन्स
- प्रोसेसर: लेटेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 चिपसेट
- रॅम: 12GB पर्यंत
- स्टोरेज: 512GB पर्यंत
Motorola razr 50 ultra मॉडेल ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 चिपसेटसह लाँच झाला आहे. या 4nm प्रोसेससह चांगला अनुभव देतो. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी एड्रेनो 735 GPU आहे. दमदार स्टोरेजसाठी डिव्हाईस 12GB LPDDR5X RAM च्या 512GB UFS 4.0 इंटरनल स्टोरेजसह येतो.
कॅमेरा
- रिअर कॅमेरा: ड्युअल कॅमेरा सिस्टम
- मेन लेन्स: 50 मेगापिक्सल
- सेकंडरी लेन्स: 50 मेगापिक्सल
- फ्रंट कॅमेरा: 32 मेगापिक्सल
Moto razr 50 ultra मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. याच्या बॅक पॅनलवर 1/1.95″ सह 50MP प्रायमरी कॅमेरा मिळतो याला सपोर्ट देण्यासाठी f/1.79 अपर्चर, OIS सह 50MP 2x टेलीफोटो कॅमेरा लेन्स आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा लेन्स आहे.
बॅटरी
- बॅटरी: 4000mAh
- चार्जिंग: 45 वॉट फास्ट चार्जिंग
Motorola razr 50 ultra मध्ये मोठ्या बॅकअपसाठी 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीला चार्ज करण्यासाठी 45W टर्बोपावर फास्ट चार्जिंग मिळते. तसेच 15W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट पण देण्यात आला आहे.
इतर
- Moto AI फिचर्स
- वॉटर रेसिस्टेंट (IPX8 रेटिंग)
मोटोरोला रेजर 50 अल्ट्रा मॉडेलमध्ये स्टीरियो स्पिकर, साईड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, डॉल्बी एटमॉस, IPX8 रेटिंग, ड्युअल सिम 5G, 4G VoLTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.3 सारखे अनेक पर्याय आहेत.
ऑपरेटिंग सिस्टम
- अँड्रॉईड
14Moto razr 50 ultra अँड्रॉईड 14 आधारित Hello UI सह लाँच करण्यात आला आहे. कंपनी फोनसह 3 वर्षाचे सॉफ्टवेअर अपडेट आणि 4 वर्षाचे सुरक्षा अपडेट देण्याचा पण दावा करत आहे.















