भारतात सुरू झाली जगातील सर्वात मोठी मोबाईल फॅक्टरी, मोदींनी केले उद्घाटन

जर कोणी विचारेल की कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स च्या बाबतीत जगातील सर्वात मोठी मोबाईल फॅक्टरी कोणत्या देशात आहे, तर याचे उत्तर चीन, कोरिया किंवा अमेरिका नाही तर भारत असेल. आज म्हणजे 9 जुलै ला भारतात जगातील सर्वात मोठी मोबाईल फॅक्टरी ची सुरवात झाली आहे. जगातील ही सर्वात मोठी फॅक्टरी दिग्गज कंपनी सॅमसंग ने सुरू केली आहे आणि यात 5 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे.

सॅमसंग ने भारतात केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. सॅमसंग ने ही फॅक्टरी उत्तर प्रदेश मधील नोएडा सेक्टर-81 मध्ये सुरू केली आहे ज्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरिया चे राष्ट्रपति मून जे यांचा हस्ते करण्यात आले. सॅमसंग ने या नवीन फॅक्टरी मधून एका वर्षात जवळपास 13 कोटी मोबाईल फोन बनवण्याचे ध्येय ठेवले आहे.

विशेष म्हणजे मागच्या वर्षी जुन मध्ये सॅमसंग ने 4,915 कोटी रूपयांची गुंतवणुक करून नोएडा प्लॅन्ट मध्ये विस्तार करण्याची घोषणा केली होती आणि आज फक्त एक वर्षा नंतर नवीन फॅक्टरी दुप्पट उत्पादनासाठी तयार आहे. भारतात कंपनी सध्या 6.7 कोटी स्मार्टफोन बनवत आहे आणि हा नवीन यूनिट झाल्यावर 12 कोटी पेक्षा जास्त मोबाईल फोन बनवण्यात येतील अशी आशा आहे. जवळपास 5 हजार कोटी रुपयांचा हा सॅमसंग प्लॅन्ट 35 एकर मध्ये पसरला आहे.

सॅमसंग च्या या नवीन फॅक्टरी मध्ये फक्त मोबाइलच नाही तर सॅमसंग चे अन्य प्रोडक्ट्स पण बनवले जातील. यात रेफ्रिजरेटर आणि टेलीविजन चा समावेश आहे. एकीकडे देशात सॅमसंग च्या या प्रोडक्टस ची उपलब्धता वाढेल तर दुसरीकडे या इलेक्ट्रानिक प्रोडक्ट्स च्या किंमत पण कमी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे वर्ष 2016-17 मध्ये सॅमसंग चा मोबाईल बिजनेस रेवेन्यू 34,400 कोटी होता ज्यात कंपनी ने एकूण 50,000 कोटींची विक्री केली होती.

हेही लक्षात असू दे की भारतात सध्या सॅमसंग 2 प्लॅन्ट च्या मदतीने आपले प्रोडक्ट्स बनवत आहे. यात यूपी मधील नोएडा आणि तामीळनाडू मधील श्रीपेरूं बंदूर यांचा समावेश आहे. या दोन प्लॅन्ट सोबतच सॅमसंग ने भारतात 5 रिसर्च अ‍ॅण्ड डेवलप्मेंट सेंटर आणि 1 डिजाईन सेंटर बनवाला आहे. तसेच संपूर्ण देशात सर्विस देण्यासाठी सॅमसंग ने सध्या 1.5 लाख पेक्षा जास्त रिटेल आउटलेट उघडले आहेत. सॅमसंग कडून 70 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here