Realme C61 लवकर होऊ शकतो लाँच, भारतीय BIS सह या सर्टिफिकेशनवर झाला लिस्ट

रियलमी भारतासह जागतिक बाजारात आपल्या सी-सीरीजचा विस्तार करू शकतो, यानुसार नवीन Realme C61 मोबाईल बाजारात येण्याची शक्यता आहे. याच्या लाँचची बातमी यामुळे अजून व्हायरल होत आहे कारण डिव्हाईस ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS), एफसीसी आणि एनबीटीसी सर्टिफिकेशनवर दिसून आला आहे. चला, पुढे लिस्टिंगमध्ये समोर आलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Realme C61 बीआयएस आणि NBTC लिस्टिंग

  • रियलमीचा नवीन स्मार्टफोन RMX3930 मॉडेल नंबरसह बीआयएस सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसला आहे.
  • BIS सर्टिफिकेशनवर जो मॉडेल नंबर समोर आला आहे तो एनबीटीसी प्लॅटफॉर्मवर पण आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिस्टिंग फोटोमध्ये पाहू शकता की डिव्हाईसचे नाव पण एनबीटीसी लिस्टिंगमध्ये दिसून येत आहे.
  • नाव आणि मॉडेल नंबर व्यतिरिक्त या दोन्ही प्लॅटफॉर्मवर फोनचे इतर कोणतीही माहिती नाही, परंतु हा याच्या लवकर लाँच होण्याचा इशारा आहे.

Realme C61 एफसीसी लिस्टिंग

  • एफसीसी प्लॅटफॉर्म पाहता मोबाईलचा मॉडेल नंबर RMX3930 आहे.
  • एफसीसी लिस्टिंगनुसार डिव्हाईसमध्ये युजर्सना 5000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. याची रेटेड व्हॅल्यू 4880mAh ची आहे.
  • मोबाईलमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 5, LTE, ब्लूटूथ, एनएफसी, जीपीएस सारखे फिचर्स मिळण्याची चर्चा आहे.
  • लिस्टिंगमध्ये फोनचे वजन 188 ग्राम आणि डायमेंशन 167.26 × 76.67 × 7.84mm सांगण्यात आले आहे.

Realme C61 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • नवीन मोबाईल Realme C61 खूप स्वस्त किंमतीमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
  • डिव्हाईसमध्ये युजर्सना परफॉरमेंससाठी UniSoC T612 चिपसेट आणि माली जी 57 जीपीयू दिला जाऊ शकतो.
  • फोनला चालवण्यासाठी यात 5000mAh ची मोठी बॅटरी आणि 45 वॉट SuperVOOC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.
  • कॅमेरा फिचर्स पाहता Realme C61 स्मार्टफोन 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 8 मेगापिक्सल फ्रंट
  • कॅमेरा लेन्ससह सादर होण्याचा अंदाज आहे.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here