8 जीबी रॅम, 50MP फ्रंट, रिअर कॅमेरा, Dimensity 8020 चिपसह Infinix Zero Flip ग्लोबली लाँच, जाणून घ्या किंमत

इंफिनिक्सने फोल्डेबल स्मार्टफोन रेंज मध्ये पाय ठेवला आहे. यानुसार Infinix Zero Flip ग्लोबल बाजारात आला आहे. हा ब्रँडचा पहिला फोल्ड फोन आहे. आशा आहे की याला भारतीय बाजारात पण लवकर लाँच केले जाऊ शकते. तसेच या फ्लिप स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना 3.64 इंचाचा एक्सटर्नल व 6.9 इंचाचा प्रायमरी डिस्प्ले, 8 जीबी रॅम, 512 जीबी स्टोरेज, 4,720mAh बॅटरी सारखे अनेक स्पेक्स दिले आहेत. चला, पुढे इंफिनिक्स झिरो फ्लिप संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Infinix Zero Flip चे स्पेसिफिकेशन

  • इंटरनल डिस्प्ले: फोनमध्ये ग्राहकांना आंतरिक स्क्रीनच्या रूपामध्ये 6.9-इंचाचा LTPO AMOLED FHD+ डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यावर 1080×2640 पिक्सल रिजॉल्यूशन,120Hz रिफ्रेश रेट, 1400 निट्स पीक ब्राईटनेस, 2160Hz PWM डिमिंगला सपोर्ट मिळतो.
  • आऊटर डिस्प्ले: फोनमध्ये 3.64-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. यावर 1056×1066 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 1100निट्स पीक ब्राईटनेस आणि 1920Hz PWM डिमिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर गोरिल्ला ग्लास विक्टस 2 चे प्रोटेक्शन आहे.
  • चिपसेट: इंफिनिक्स झिरो फ्लिप 5 जी स्मार्टफोनमध्ये परफॉरमेंससाठी MediaTek Dimensity 8020 चिपसेट देण्यात आला आहे. हा मीडियाटेक चिप 6 एनएम प्रोसेसवर आधारित ऑक्टा-कोर सीपीयू आहे आणि याची अधिकतम क्लॉक स्पीड 2.6 गीगाहर्ट्स आहे.
  • स्टोरेज आणि रॅम: डिव्हाईसमध्ये एक्सटेंटेडला सपोर्टसह 16GB पर्यंत रॅम पावरचा उपयोग केला जाऊ शकतो. तसेच, सामान्य स्तरावर 8GB रॅम सादर करण्यात आली आहे. तसेच, हा 512 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येतो.

  • फ्रंट कॅमेरा: हा डिव्हाईस 50MP सॅमसंग JN1, ऑटोफोकस फ्रंट कॅमेरासह आहे. ज्यामुळे तुम्ही चांगला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करण्याचा अनुभव घेऊ शकता.
  • रिअर कॅमेरा: Infinix Zero Flip मोबाईलमध्ये 50MP चा सॅमसंग GN5 मेन लेन्स OIS ला सपोर्टसह मिळतो. त्याचबरोबर 50MP अल्ट्रा वाईड लेन्स देण्यात आली आहे. फ्रंट आणि रिअर कॅमेरा 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाऊ शकते. तसेच मध्ये व्लॉगिंग, DV मोड, GoPro मोड सारखे ऑप्शन पण आहेत.
  • बॅटरी आणि चार्जिंग: फोनमध्ये कंपनीने पावर बॅकअपसाठी 4,720mAh बॅटरी लावली आहे. त्याचबरोबर 70W चार्जिंग फास्ट चार्जिंग मिळते. हेच नाही तर 10W वायर्ड रिवर्स चार्जिंग पण आहे.
  • ओएस: Infinix Zero Flip स्मार्टफोन Android 14 आधारित XOS 14.5 वर चालतो. त्याचबरोबर 2 OS अपग्रेड आणि 3 वर्षाचे सुरक्षा अपडेट मिळतील.
  • इतर: फोनमध्ये साईड फिंगरप्रिंट सेन्सर, JBL ड्युअल स्पिकर, x-अ‍ॅक्सिस लीनियर मोटर, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.4, NFC, USB-C सारखे अनेक फिचर्स मिळतात.
  • वजन आणि डायमेंशन: हा अनफोल्डेड कंडीशनमध्ये 170.35 x 73.4 x 7.64mm आणि फोल्डेड मध्ये 87.49 x 73.4 x 16.04mm चा आहे. तर याचे वजन 195 ग्रॅम आहे.

Infinix Zero Flip ची किंमत

इंफिनिक्स झिरो फ्लिप 8GB+512GB इंटरनल स्टोरेजसह येतो. याची प्रारंभिक किंमत 600 डॉलर म्हणजे जवळपास 50,100 रुपये ठेवण्यात आली आहे. हा ब्लॉसम ग्लो आणि रॉक ब्लॅक सारख्या दोन कलरमध्ये सेल होईल. कंपनीनुसार फोनची किंमत ग्लोबल देशांनुसार वेगवेगळी असू शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here