स्वस्त Redmi 14C 5G फोन लवकरच येईल बाजारात, माहितीचा झाला खुलासा

डिसेंबर 2023 मध्ये रेडमीनं भारतात आपला लो बजेट स्मार्टफोन Redmi 13C 5G लाँच केला होता जो सध्या फक्त 10,499 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. आता बातमी आली आहे की कंपनी या मोबाइलच्या अपग्रेडेड व्हर्जनवर काम करत आहे जो Redmi 14C 5G नावाने लाँच केला जाईल. हा रेडमी 5जी फोन IMEI database वर दिसला आहे ज्याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Redmi 14C 5G

रेडमी 14सी 5जी फोन आयएमआय डेटाबेसमध्ये टेक वेबसाईट गिजमोचायनानं पाहिला आहे. इथे मोबाईलचे चार मॉडेल नंबर समोर आले आहेत ज्यात “2411DRN47G“, “2411DRN47R“, “2411DRN47I” आणि “2411DRN47C“ चा समावेश आहेत. विशेष म्हणजे तिसरा मॉडेल भारतीय बाजारात येऊ शकतो कारण नंबर मध्ये ‘I’ म्हणजे India आहे. त्यामुळे Redmi 14C 5G फोन भारतात येईल याची पुष्टी झाली आहे. सध्या या फोनची इतकीच माहिती समोर आली आहे.

Redmi 13C 5G प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स

किंमत

रेडमी 13सी 5जी फोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. याच्या 4जीबी रॅम मॉडेलची किंमत 10,499 रुपये आहे. तर 6जीबी रॅम मॉडेलची किंमत 11,999 रुपये आहे. तसेच सर्वात मोठ्या 8जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. हा स्वस्त रेडमी फोन Startrail Silver, Startrail Green आणि Starlight black कलरमध्ये विकत घेता येईल

स्क्रीन

Redmi 13C 5G फोनमध्ये 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.74 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90Hz रिफ्रेश रेट, 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 600nits ब्राइटनेसला सपोर्ट करते. हा रेडमी फोन TÜV flicker-free certification आणि low blue light सर्टिफिकेशनसह येतो. .

प्रोसेसर

रेडमी 13सी 5जी फोन 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या MediaTek Dimensity 6100+ ऑक्टाकोर प्रोसेसर सह लाँच झाला आहे. या 8 कोर प्रोसेसर मध्ये 2.2GHz क्लॉक स्पीड असलेले 2 कोर्टेक्स-ए74 कोर तसेच 2.0GHz क्लॉक स्पीड असलेले 4 कोर्टेक्स-ए55 कोर देण्यात आले आहेत. तसेच ग्राफिक्ससाठी हा मोबाइल माली-जी57 एमसी2 जीपीयूला सपोर्ट करतो.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी रेडमी 13सी 5जी ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 1/2.76” सेन्सर साईज असलेला 50MP AI मेन सेन्सर देण्यात आला आहे जो 0.612μm पिक्सलला सपोर्ट करतो तसेच एफ/1.8 अपर्चरवर चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5MP फ्रंट कॅमेरा मिळतो.

रॅम

Redmi 13C 5G फोन भारतात तीन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. दुसरा व्हेरिएंट 6GB रॅमसह 128GB मेमरीला सपोर्ट करतो. तसेच सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 256GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा मोबाइल 8GB Virtual RAM टेक्नॉलॉजीसह आला आहे जी फोनचा फिजिकल रॅम डबल करते. तसेच फोनमध्ये 1TB पर्यंत मायक्रोएसडी कार्ड देखील लावता येतो.

बॅटरी

पावर बॅकअपसाठी रेडमी 13सी 5जी फोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी यात 18W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते. फोन चार्ज करण्यासाठी मोबाइलमध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट मिळतो. कंपनी फोन बॉक्समध्ये फक्त 10वॉटचा चार्जर देत आहे.

इतर फिचर्स

रेडमी 13सी 5जी फोनमध्ये 7 5G Bands देण्यात आले आहेत. फोनमध्ये Dual SIM वापरता येतात. यात Bluetooth 5.3, वायफाय 5सह 3.5mm जॅक देखील मिळतो. हा रेडमी फोन स्टार ट्रायल डिझाईनवर बनला आहे ज्याची थिकनेस 8.19एमएम आहे. फोनला आयपी रेटिंग देखील मिळाली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here