64MP Camera आणि 24GB RAM च्या ताकदीसह OPPO A3 Pro झाला चीनमध्ये लाँच

ओप्पोने आपल्या ‘ए’ सीरिज अंतर्गत नवीन स्मार्टफोन OPPO A3 Pro लाँच केला आहे. हा मोबाईल चीनी बाजारात सादर करण्यात आला आहे जो 24GB RAM (12GB+12GB) आणि MediaTek Dimensity 7050 चिपसेटच्या ताकदीसह आला आहे. तसेच या ओप्पो मोबाईलमध्ये 64MP Camera, 67W Fast Charging आणि IP69 रेटिंग मिळते, ज्याची संपूर्ण माहिती व किंमत तुम्ही पुढे वाचू शकता.

ओप्पो ए3 प्रो चीनमध्ये तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. याच्या 8 जीबी रॅम मॉडेलची किंमत 1999 युआन म्हणजे 23,500 रुपयांच्या आसपास आहे. या फोनच्या 12 जीबी+256 जीबी मॉडेल 2199 युआन तसेच 12 जीबी+512 जीबी व्हेरिएंट 2499 युआन मध्ये लाँच झाला आहे. ही किंमत भारतीय चलनानुसार क्रमश: 25,999 रुपये तसेच 29,000 रुपयांच्या आसपास आहे. चीनमध्ये हा फोन Azure, Pink आणि Blue कलरमध्ये विकला जाईल.

OPPO A3 Pro चे स्पेसिफिकेशन

  • 6.7″ 120Hz OLED Display
  • MediaTek Dimensity 7050
  • 12GB RAM + 512GB Storage
  • 64MP Dual Rear Camera
  • 67W Fast Charging
  • 5,000mAh Battery

डिस्प्ले : ओप्पो ए 3 प्रो 5 जी फोन 2412 x 1080 पिक्सल रेजोल्यूशनच्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही कर्व्ड स्क्रीन आहे जी ओएलइडी पॅनलवर बनली आहे तसेच 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळतो.

प्रोसेसर : हा ओप्पो मोबाईल अँड्रॉईड 14 वर बनला आहे जो कलर ओएसवर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी यात 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर बनलेला मीडियाटेक डाइमेंसिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.6 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो. ग्राफिक्ससाठी यात माली जी 68 जीपीयू मिळतो.

मेमरी : OPPO A3 Pro को चीनमध्ये तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. याच्या बेस मॉडेलमध्ये 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज आहे. तसेच दोन्ही व्हेरिएंट्स 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो, ज्यामध्ये 256 जीबी स्टोरेज तसेच 512 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. हा मोबाईल 12 जीबी पर्यंतच्या वचुर्अल रॅमला पण सपोर्ट करतो.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ओप्पो ए 3 प्रो मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सल मेन सेन्सर आहे जो 2 मेगापिक्सल पोर्टरेट लेन्ससह चालतो. तसेच सेल्फी काढणे तसेच रिल्स बनविण्यासाठी या फोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी : OPPO A3 Pro 5G फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 67 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी याला 44 मिनिटामध्ये 0 ते 100 चार्ज करण्याचा दावा करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here