OPPO A3m 5G आणि OPPO A3x 5G ची प्रमुख माहिती आली समोर, टीईएनएए साईटवर झाला लिस्ट

ओप्पो येत्या काही आठवड्यांमध्ये आपल्या A-सीरीजचा विस्तार करू शकतो यानुसार OPPO A3m 5G आणि OPPO A3x 5G सारखे दोन मॉडेल लाँच होण्याची शक्यता आहे. हा सध्या टीईएनएए सर्टिफिकेशन वेबसाईटवर प्रमुख स्पेसिफिकेशन आणि डिझाईनसह स्पॉट केला आहे. चला, पुढे याचे फिचर्स आणि लूकबाबत सविस्तर जाणून घेऊया.

OPPO A3x 5G स्पेक्स आणि डिझाईन (टीईएनएए लिस्टिंग)

  • टीईएनएए वेबसाईटवर OPPO A3x चा मॉडेल नंबर PKD130 समोर आला आहे.
  • तुम्ही खाली फोटो मध्ये पाहू शकता की स्मार्टफोनमध्ये फ्लॅट-एज डिझाईन पाहायला मिळाली आहे.
  • मोबाईलच्या बॅक पॅनलवर वर्टिकल मॉड्यूलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आणि रिंग LED दिसते.
  • मोबाईलमध्ये साईड-माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर असण्याची संभावना आहे.
  • TENAA सर्टिफिकेशननुसार OPPO A3x मध्ये HD+ (1604 × 720 पिक्सल) रिजॉल्यूशन असलेला 6.67-इंचाचा TFT डिस्प्ले मिळू शकतो.
  • फोनचे वजन 186 ग्रॅम आणि डायमेंशन 165.69 × 76.04 × 7.68 मिमी सांगण्यात आले आहे.
  • बॅटरीच्या बाबतीत यात 4970mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
  • परफॉरमेंससाठी स्मार्टफोनमध्ये 2.4GHz पीक फ्रिक्वेन्सी असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळण्याची चर्चा आहे.
  • ओप्पो ए 3 एक्सच्या रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 32MP आणि 2MP चा सेकंडरी कॅमेरा मिळू शकतो. तर फ्रंटला 8MP चा लेन्स लावली जाऊ शकते.
  • स्मार्टफोन 6GB, 12GB रॅम आणि 128GB, 256GB स्टोरेज सारख्या दोन पर्यायामध्ये येऊ शकतो.

OPPO A3m 5G स्पेक्स आणि डिझाईन (टीईएनएए लिस्टिंग)

  • टीईएनएए लिस्टिंगमध्ये OPPO A3m 5G चा मॉडेल नंबर PKD120 आहे. ही डिझाईन आणि स्पेक्सच्या बाबतीत OPPO A3x सारखीच आहे.
  • OPPO A3m बाबत माहिती आहे की हा OPPO A3x चा चीनच्या टेलीकॉम एक्सक्लूसिव्ह व्हेरिएंट असू शकतो.
  • तसेच OPPO A2x आणि OPPO A2m पण एक सारखे स्मार्टफोन आहेत आणि OPPO A2m ला चायना टेलीकॉमच्या माध्यमातून सेल केले जाऊ शकते.
  • आशा आहे की आता OPPO A3m 5G सह पण ब्रँड हा प्लॅन फॉलो करू शकतो.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here