Samsung Galaxy Z Flip 6 भारतात लाँच, या फोल्डेबल मोबाईलमध्ये मिळेल 50MP कॅमेरा आणि 12GB रॅम

सॅमसंगचा फोल्डेबल मोबाईल भारतात लाँच झाला आहे. Galaxy Z सीरीजची नवीन आवृत्ती बाजारात आणताना कंपनीने Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 भारतात सादर केले आहेत. Z fold 6 चे तपशील (येथे क्लिक) करुन वाचू शकता. तसेच एक अतिशय स्टायलिश लूक आणि शक्तिशाली स्पेसिफिकेशन ने सुसज्ज असलेल्या Samsung Galaxy Z Flip 6 या फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन बद्दलची माहिती पुढे दिली आहे.

Samsung Galaxy Z Flip 6 ची किंमत

  • 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज = 1,09,999 रुपये
  • 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज = 1,21,999 रुपये

Samsung Galaxy Z Flip 6 5G फोन भारतात 12 जीबी रॅम सह लाँच झाला आहे. जो 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज मध्ये खरेदी केला जाऊ शकेल. फोनच्या 12 जीबी + 256 जीबी मॉडेलची किंमत 109,999 रुपये आणि 12 जीबी + 512 जीबी या व्हेरिएंटची किंमत 121,999 रुपये आहे. Galaxy Z Flip6 हा अनेक आकर्षक रंगांमध्ये विकला जाईल, ज्याला सिल्व्हर शॅडो, यलो, ब्लू आणि मिंटमध्ये खरेदी केले जाऊ शकते. तसेच कंपनीच्या वेबसाईटवर त्याचे क्राफ्टेड ब्लॅक, व्हाईट आणि पीच कलर मॉडेल्सही उपलब्ध होतील.

  • ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यूजर्स सॅमसंग अपग्रेड स्कीम अंतर्गत 8000 रुपयांची सूट मिळवू शकतात. तर त्याच्या पर्यायामध्ये बँक कार्डवर 8000 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. ग्राहकांना या दोनपैकी फक्त एका योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • त्याचप्रमाणे फक्त 999 रुपये अतिरिक्त भरून, तुम्ही 9999 रुपयांचा रिप्लेसमेंट पॅक मिळवू शकता. ज्यामध्ये फोन स्क्रीन किंवा मोबाईलचा कोणताही भाग वर्षातून दोनदा विनामूल्य बदलता येईल.
  • Samsung Galaxy Z Flip 6 ला 9 महिने नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत देखील खरेदी केले जाऊ शकते.
    जे मोबाईल वापरकर्ते आधीच सॅमसंग फ्लॅगशिप फोन वापरत आहेत, त्यांनी त्यांचा फोन एक्सचेंज केल्यावर त्यांना 15,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल.

Samsung Galaxy Z Flip 6 चे स्पेसिफिकेशन

  • 6.7″ 120 हर्ट्झ डायनॅमिक ॲमोलेड 2 एक्स स्क्रीन
  • 3.4″ 60 हर्ट्झ सुपर ॲमोलेड कव्हर डिस्प्ले
  • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3
  • 12GB रॅम + 512GB स्टोरेज
  • 50 एमपी+ 12 एमपी बॅक कॅमेरा
  • 10 एमपी फ्रंट कॅमेरा
  • 25 वॉट 4, 000 एमएएच बॅटरी

मुख्य स्क्रीन: Galaxy Z Flip6 5G फोन 22:9 आस्पेक्ट रेशोवर बनवला आहे, जो 2640 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ प्रायमरी डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही डायनॅमिक ॲमोलेड 2एक्स पॅनेलवर तयार केलेली राऊंड कॉर्नर स्क्रीन आहे जी 120Hz रिफ्रेश रेटवर काम करते. कंपनीने याला इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले असे नाव दिले आहे.

कव्हर स्क्रीन: Samsung Galaxy Z Flip 6 फोल्ड केल्यानंतर 3.4 इंचाचा सेकंडरी डिस्प्ले दिसून येतो. ही कव्हर स्क्रीन सुपर ॲमोलेड पॅनेलवर बनवली आहे, जी 60Hz रिफ्रेश रेटवर काम करते आणि 720 x 748 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करते.

प्रोसेसर: Samsung Galaxy Z Flip 6 हा अँड्रॉईड 14 आधारित One UI 6.1.1 वर लाँच करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी यात 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनवलेला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे जो 3.3 गीगाहर्ट्ज़ पर्यंतच्या क्लॉक स्पीडने रन करतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, Galaxy Z Fold 6 देखील या चिपसेटवर चालतो.

मेमरी: Galaxy Z Flip 6 हा भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनचे बेस मॉडेल 12GB रॅमसह 256GB स्टोरेजला सपोर्ट करते. तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12GB रॅमसह 512GB इंटरनल स्टोरेज दिले गेले आहे.

बॅक कॅमेरा: हा फोल्डेबल सॅमसंग स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. त्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 1.0μm 50 मेगापिक्सेलचा वाईड-एंगल OIS सेन्सर दिला गेला आहे जो F/2.2 अपर्चर असलेल्या 12 मेगापिक्सेलच्या अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स सोबत मिळून काम करतो.

फ्रंट कॅमेरा: Samsung Galaxy Z Flip 6 हा सेल्फी, व्हिडिओ कॉलिंग आणि रील बनवण्यासाठी 10 मेगापिक्सेलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा 1.22μm पिक्सेल आकाराचा सेन्सर आहे जो 85˚ FOV ला सपोर्ट करतो आणि एफ/2.2 अपर्चरवर काम करतो.

बॅटरी: पॉवर बॅकअपसाठी Samsung Galaxy Z Flip 6 5G फोन 4,000mAh च्या बॅटरीला सपोर्ट करतो. तर ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी या स्मार्टफोनला 25W फास्ट चार्जिंग आणि फास्ट वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज केले गेले आहे.

इतर वैशिष्ट्ये: Galaxy Z Flip 6 हा स्मार्टफोन IP48 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात Wi-Fi 6E आणि Bluetooth 5.3 मिळत आहे. तर डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेसाठी या मोबाईलला सॅमसंग नॉक्स आणि नॉक्स व्हॉल्टचा सपोर्ट आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here