OnePlus Nord 4 16 जुलैला भारतात लाँच होईल. या दिवशी कंपनी OnePlus Summer Launch Event चे आयोजन करणार आहे. ज्याच्या मंचावरून नॉर्ड 4 स्मार्टफोनसह OnePlus Pad 2, OnePlus Nord Buds 3 Pro आणि OnePlus Watch 2R पण लाँच होतील. भारतात तुम्ही आज 16 जुलैला संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी हा क्रार्यक्रम लाईव्ह पाहू शकता, ज्याची लाईव्ह लिंक खाली देण्यात आली आहे.
OnePlus Nord 4 लाँच लाईव्ह लिंक:
OnePlus Nord 4 स्मार्टफोन तसेच इतर वनप्लस प्रोडक्ट लाँच कंपनी वेबसाईटसह ब्रँडच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण लाईव्ह दिसत आहे.
OnePlus Nord 4 भारतातील किंमत (लीक)
मागच्या आठवड्याच्या लीकमध्ये नॉर्ड 4 ची ऑफर किंमत समोर आली होती ज्यात मोबाईलचा किंमत 27,999 रुपये सांगण्यात आली आहे. लीकनुसार 8GB RAM आणि 128GB Memory असलेला OnePlus Nord 4 31,999 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. तसेच लीकमध्ये खुलासा झाला होता की या स्मार्टफोनवर 4 हजार रुपयांचा डिस्काऊंट तसेच 6 महिन्याचे नो-कॉस्ट ईएमआय पण दिले जाऊ शकते.
OnePlus Nord 4 चे स्पेसिफिकेशन (लीक)
- 6.74 इंचाचा 120 हर्ट्झ ओएलइडी डिस्प्ले
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 3 प्रोसेसर
- 12 जीबी रॅम + 512जीबी स्टोरेज
- 50 मेगापिक्सल बॅक कॅमेरा
- 16 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर
- 5,500 एमएएच बॅटरी
- 100 वॉट फास्ट चार्जिंग
डिस्प्ले : OnePlus Nord 4 6.74 इंचाच्या 1.5K ओएलईडी स्क्रीनवर लाँच केले जाऊ शकते. लीकनुसार या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 2150nits ब्राईटनेस आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फिचर्स मिळतील.
प्रोसेसर : लीकनुसार हा वनप्लस स्मार्टफोन 4 नॅनोमीटरवर बनलेल्या Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर लाँच होईल. हा प्रोसेसर 2.8GHz पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो.
मेमरी : लीकनुसार हा मोबाईल 8GB RAM आणि 12GB RAM वर लाँच केला जाऊ शकतो. तसेच स्मार्टफोनमध्ये 128GB, 256GB तसेच 512GB स्टोरेज पाहायला मिळू शकते.
बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्ड 4 5 जी ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. यात OIS टेक्नॉलॉजी असलेला 50MP SONY LYT 600 मेन सेन्सर तसेच 8MP Ultra-wide IMX355 लेन्स मिळू शकते.
फ्रंट कॅमेरा : सेल्फी काढणे, व्हिडिओ कॉलिंग करणे तसेच रिल्स बनविण्यासाठी OnePlus Nord 4 मध्ये 16MP Front कॅमेरा दिला जाणार असल्याची चर्चा आहे. लीकनुसार हा Samsung S5K3P9 सेन्सर असेल.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी वनप्लस नॉर्ड 4 5 जी फोनला 5,500mAh battery वर लाँच केले जाऊ शकते. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 100W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाईल.















