शाओमी येत्या काही महिन्यामध्ये आपली 14T सीरीज लाँच करू शकतो. या अंतर्गत Xiaomi 14T आणि Xiaomi 14T Pro स्मार्टफोन येण्याची शक्यता आहे. हा फोन येण्याआधी पण काही सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाला आहे. तसेच, आता प्रो मॉडेलचा ग्लोबल व्हेरिएंट बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर स्पॉट झाला आहे. ज्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.
Xiaomi 14T Pro गीकबेंच लिस्टिंग
- गीकबेंच लिस्टिंगमध्ये समोर आले आहे की शाओमीचा नवीन मोबाईल 2407FPN8EG मॉडेल नंबरसह लिस्टेड आहे.
- फोनचे नाव Xiaomi 14T Pro काही दिवसांपू्र्वी इंडोनेशिया टेलीकॉम सर्टिफिकेशनवर दिसले होते.
- Xiaomi 14T Pro स्मार्टफोनने सिंगल कोरमध्ये 9,369 अंक आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 26,083 अंक मिळवले आहेत.
- डिव्हाईसमध्ये ‘रोथको’ मदरबोर्ड असेल. हा 3.4GHz ची पीक क्लॉक स्पीड, माली-G720-इमॉर्टलिस MC12 GPU सह ऑक्टा-कोर चिपसेट असलेला असू शकतो.
- गीकबेंच माहितीवरून असे वाटत आहे की नवीन फोन MediaTek Dimensity 9300 Plus प्रोसेसरसह येऊ शकतो.
- गीकबेंचनुसार डिव्हाईसमध्ये जवळपास 12GB रॅम दिली जाऊ शकते. तसेच हा अँड्रॉईड 14 वर आधारित ठेवला जाऊ शकतो.
Xiaomi 14T सीरीजची माहिती (संभाव्य)
- Xiaomi 14T सीरीज स्मार्टफोनला ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये लाँच केले जाऊ शकते.
- सीरीजच्या टॉप व्हेरिएंट Xiaomi 14T Pro मध्ये MediaTek Dimensity 9300 प्लस प्रोसेसर लावला जाऊ शकतो. यात 3.4GHz पर्यंतच्या हाय क्लॉक स्पीडचे पावर असू शकते.
- कॅमेरा एफवी 5 लिस्टिंगनुसार Xiaomi 14T Pro मध्ये f/1.6 अपर्चर, 12.6MP पिक्सल बिनिंग आणि OIS सह प्रायमरी रिअर कॅमेरा मिळू शकतो.
- 12.6MP पिक्सल बिनिंग टेक्नॉलॉजीवरून अंदाज आहे की मोबाईलमध्ये 50MP चा प्रायमरी लेन्स दिली जाऊ शकते.
- Xiaomi 14T Pro फोनमध्ये f/2.0 अपर्चर असलेला सेल्फी कॅमेरा मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. जो 8.1MP पिक्सल-बिन्ड फोटो कॅप्चर करण्याच्या क्षमतेसह येऊ शकतो.
- रिपोर्टनुसार चांगल्या कॅमेरा एक्सपीरियंससाठी फोनमध्ये Leica लेन्सला सपोर्ट पण असू शकतो.
- एनबीटीसी सर्टिफिकेशननुसार अगामी Xiaomi 14T Pro मध्ये GSM /WCDMA/LTE/NR कनेक्टिव्हिटी मिळू शकते.















