वीवो ने गेल्या आठवड्यात अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर आपला हेलो नॉच डिस्प्ले असलेला स्मार्टफोन वाय95 लॉन्च केला होता. डुअल रियर कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन सध्या फिलिपिंस मधेच लॉन्च करण्यात आला आहे पण आता वीवो लवकरच हा स्मार्टफोन भारतात आणणार आहे. 91मोबाईल्सला सूत्रांकडून बातमी मिळाली आहे कि कपंनी नोव्हेंबरच्या 26 तारखेला भारतात आपली वाय सीरीज वाढवत एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे आणि हा स्मार्टफोन वाय95 असेल.
वीवो इंडिया ने अजूनतरी वाय95 बद्दल कोणतीही आॅफिशियल माहिती दिली नाही पण 91मोबाईल्सला रिटेल मधील सूत्रांनी सांगितले आहे कि वीवो वाय95 येत्या 26 नोव्हेंबर पासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल. मिळालेल्या माहितीनुसार वीवो स्मार्टफोन 16,990 रुपयांमध्ये लॉन्च करेल. वीवो वाय95 आॅनलाईन प्लॅटफॉर्म सोबत आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.
वीवो वाय95 ‘वी’ शेप वाल्या हेलो नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. वीवोचा हा नवीन फोन 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.22-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. वाय95 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच 4.5 ओएस वर सादर करण्यात आला आहे जो 1.9गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो.
कंपनी ने वाय95 4जीबी रॅम सह सादर केला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते. वाय95 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
वीवो वाय95 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोन मध्ये पावर बॅकअप साठी ओटीजी सपोर्ट सह 4,030एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे