ऑनरने भारतीय बाजारात आपल्या धाकड स्मार्टफोन Honor Magic 6 Pro ला लाँच केले आहे. हा भारतात ब्रँडचा आता पर्यंतचा सर्वात जबरदस्त डिवाइस आहे. ह्यात युजर्सना 50MP ड्युअल सेल्फी कॅमेरा, 180 मेगापिक्सल पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स, 12 जीबी रॅम, 512 जीबी पर्यंत स्टोरेज, 5600mAh बॅटरी देण्यात आली आहे. चला, पुढे फोनची किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन सविस्तर जाणून घेऊया.
Honor Magic 6 Pro ची किंमत आणि उपलब्धता
- भारतीय बाजारात ऑनरच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन मॅजिक 6 प्रो ला सिंगल स्टोरेज ऑप्शनमध्ये आणले गेले आहे.
- डिव्हाईसच्या 12 जीबी रॅम +512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 89,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
- भारतीय युजर्स Honor Magic 6 Pro ला ब्लॅक आणि एपी ग्रीन सारख्या दोन कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.
- हा स्मार्टफोन अॅमेझॉन प्लॅटफॉर्म वर 15 ऑगस्टपासून सेलसाठी उपलब्ध होईल.
- लाँच ऑफर अंतर्गत ब्रँडद्वारे नो कॉस्ट EMI आणि अन्य बँक ऑफर केली जाईल.
Honor Magic 6 Pro चे स्पेसिफिकेशन
डिझाईन
- पॅटर्न डिझाईन
- 5 स्टार SGS ड्रॉप रेजिस्टेंस
Honor Magic 6 Pro च्या बॅक पॅनलवर शानदार डॉम शेप डिझाईन आहे. त्याचबरोबर पूर्ण बॅकवर कुशन आणि पॅटर्न पाहायला मिळतात. डिव्हाईसच्या फ्रंटला नॅनो क्रिस्टल शील्ड लावली आहे. जी 5 स्टार SGS ड्रॉप रेजिस्टेंस सर्टिफाईड आहे. फोनचा फ्रंट पॅनल कर्व शेपचा आहे. स्क्रीनवर मध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
डिस्प्ले
- 6.80 इंचाचा OLED डिस्प्ले
- 120Hz रिफ्रेश रेट
- 1600 निट्स पीक ब्राईटनेस
Honor Magic 6 Pro मध्ये 6.80 इंचाचा मोठा कर्व HD प्लस OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट, 453PPI पिक्सल डेंसिटी, 1600 नीड्स पीक ब्राईटनेस, 10.7 मिलियन कलर, डॉल्बी व्हिजन, एचडीआर विविद टेक्नॉलॉजी काला सपोर्ट मिळतो.
चिपसेट
- स्नॅपड्रॅगन 8 जेन 3
- 3.3GHz हाय क्लॉक स्पीड
ब्रँडने परफॉर्मन्ससाठी डिव्हाईसमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट दिली आहे. तसेच हा आता पर्यंतचा कॉलकामचा सर्वात फास्ट प्रोसेसर आहे. ज्यात युजर्सना 3.3GHz पर्यंतची हाय क्लॉक स्पीड मिळते.
स्टोरेज आणि रॅम
- 12 जीबी रॅम
- 512 जीबी स्टोरेज
Honor Magic 6 Pro मध्ये कंपनीने 12 जीबी LPDDR5X रॅम आणि 512 जीबी पर्यंत UFS 4.0 इंटरनल स्टोरेज दिले आहे. ज्याच्या मदतीने युजर्स फोटो, व्हिडिओ, फाईल्स किंवा इतर कोणत्याही डेटाला मोठया मात्रेमध्ये सेव्ह करून ठेवू शकता.
कॅमेरा
- 50+180+50MP रिअर कॅमेरा
- 50MP ड्युअल फ्रंट कॅमेरा
Honor Magic 6 Pro स्मार्टफोन कॅमेऱ्यामध्ये आश्चर्यकारक आहे. कारण यात 50 मेगापिक्सल वाईड अँगल कॅमेरा, ऑप्टिकल फोटो स्टॅबिलायजेशन सह 180 मेगापिक्सलचा 2.5 एक्स पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि एक इतर ऑटो फोकस असलेला 50 मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा लावला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ब्रँडने ड्युअल कॅमेरा दिला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि एक डेप्थ सेन्सर मिळतो.
बॅटरी आणि चार्जिंग
- 5600mAh बॅटरी
- 80 वॉट फास्ट चार्जिंग
- 66 वॉट वायरलेस चार्जिंग
फोनला चालविण्यासाठी यात 5600mAh ची बॅटरी आहे. ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी 80 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. तसेच डिव्हाईसमध्ये ब्रँडने 66 वॉट वायरलेस चार्जिंग पण दिली आहे.
इतर फिचर्स
- IP68 रेटिंग
- इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर
Honor Magic 6 Pro मध्ये युजर्सना पाणी आणि धूळीपासून वाचणारी IP68 रेटिंग, सुरक्षेसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ब्लूटूथ 5.3, वाय-फाय 7 आणि एनएफसी, 5 जी, 4 जी सपोर्ट, कॅमेरा आणि इतर ऑपरेशनसाठी AI टेक्नॉलॉजी सारखे अनेक पर्याय आहेत.
ऑपरेटिंग सिस्टम
- अँड्रॉईड 14
- मॅजिक ओएस 8.0
ऑपरेटिंग सिस्टम पाहता Honor Magic 6 Pro स्मार्टफोन अँड्रॉईड 14 आधारित मॅजिक ओएस 8.0 वर चालतो.















