Airtel युजर्सची बल्ले बल्ले! ‘या’ 5 रिचार्जमध्ये FREE एक्स्ट्रा डेटा आणि वॅलिडिटी, लवकरच घ्या फायदा

देशातील प्रमुख नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्यांपैकी एक Airtel नं यावेळी आपल्या ग्राहकांना अशी भेट दिली आहे, ज्यामुळे Jio आणि Vodafone Idea ग्राहकांना देखील हेवा वाटू लागला आहे. कंपनी आपल्या 5 रिचार्ज प्लॅनमध्ये एक्स्ट्रा डेटा आणि वैधता देत आहे. हे एक्स्ट्रा बेनिफिट्स कंपनी (Airtel Recharge) कडून कोणत्याही चार्जविना दिला जात आहे. अतिरिक्त डेटा आणि वैधतेसह येणाऱ्या प्लॅन्समध्ये 209 रुपये, 265 रुपये, 239 रुपये, 299 रुपये आणि 666 रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. चला जाणून घेऊया कोणत्या प्लॅनमध्ये कोणते बेनिफिट मिळत आहेत.

मोफत एक्स्ट्रा डेटा आणि वैधता

91मोबाईल्सनं Airtel Thanks App वर स्पॉट केलं की कंपनीकडून या 5 रिचार्ज प्लॅन्समध्ये अतिरिक्त डेटा आणि वैधता दिली जात आहे. तसेच जेव्हा आम्ही थर्ड पार्टी ई-कॉमर्स पेमेंट सिस्टम आणि डिजिटल वॉलेट Paytm वर हे रिचार्ज बघितले तेव्हा तिथे देखील एक्स्ट्रा बेनिफिट्स मिळत होते. परंतु कंपनीच्या साईटवर मात्र या प्लॅन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

त्यामुळे कंपनीकडून ही ऑफर काही मर्यादित युजर्ससाठी सादर करण्यात आली असावी. त्यामुळे रिचार्ज करण्याआधी एकदा एयरटेलच्या अ‍ॅपवर चेक करावे की ऑफर तुमच्या नंबरवर देखील मिळत आहे की नाही. चला जाणून घेऊया कोणत्या प्लॅनमध्ये किती एक्सट्रा डेटा आणि वैधता दिली जात आहे.

Airtel 209 Plan: या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली 1GB डेटा आणि 21 दिवसांची वैधता मिळते. परंतु कंपनीच्या ऑफरमुळे आता या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता ऑफर केली जात आहे. डेटा डेली 1 जीबीच मिळेल परंतु वैधता वाढल्यामुळे एकूण डेटा देखील वाढेल. तसेच प्लॅनमध्ये फ्री अनलिमिटेड कॉलिंग, डेली 100 एसएमएस, Hello Tunes आणि Wynk Music मिळेल.

Airtel 239 Plan: या रिचार्जमध्ये कंपनीकडून एक्स्ट्रा डेटा सोबतच एक्स्ट्रा वैधता देखील मिळत आहे. आधी या प्लॅनमध्ये 24 दिवसांची वैधता आणि 1 जीबी डेली डेटा दिला जात होते. परंतु स्पेशल ऑफरमुळे आता या प्लॅनमध्ये कंपनीकडून 1.5GB डेली डेटा आणि 28 दिवसांची वैधता मिळत आहे. तसेच प्लॅनमध्ये फ्री अनलिमिटेड कॉलिंग, डेली 100 एसएमएस, Hello Tunes आणि Wynk Music मिळत आहे.

Airtel 265 Plan: एयरटेलच्या 265 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता दिली जात आहे. तसेच या वैधतेसह युजर्सना 1GB प्रति दिन डेटा दिला जात आहे. परंतु आता कंपनीनं यात वाढ करत 30 दिवसांच्या वैधतेसह 1.5GB डेटा डेली देण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे प्लॅनमध्ये 2 दिवसांच्या एक्सट्रा वैधतेसह 17GB डेटा देखील कोणतंही अतिरिक्त शुल्क न देता मिळत आहे. तसेच प्लॅनमध्ये व्हॉइस कॉलिंग अनलिमिटेड मिळते आणि रोज 100 SMS देखील मोफत पाठवता येतात. सोबतीला फ्री Hello Tunes आणि Wynk Music चे फायदे देखील आहेतच.

Airtel 299 Plan: 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या प्लॅनमध्ये आधी 1.5GB डेटा आणि 28 दिवसांची वैधता मिळत होती. परंतु, आता कंपनी या प्लॅनमध्ये 2GB डेली डेटा ऑफर करत आहे. परंतु वैधता तीच ठेवण्यात आली आहे. तसेच प्लॅनमध्ये फ्री अनलिमिटेड कॉल आणि डेली 100 एसएमएस मिळतील. प्लॅनमध्ये फ्री Hello Tunes, Wynk Music, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक आणि 3 महिन्यांसाठी Apollo 24|7 Circle बेनिफिट्स मिळत आहेत.

Airtel 666 Plan: 666 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये आता 84 दिवसांची वैधता दिली जात आहे. आधी या प्लॅनमध्ये 77 दिवसांची वैधता दिली जात होती. अन्य बेनिफिट्समध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा सह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि प्रतिदिन 100 SMS पण दिले जात आहेत. तसेच रिचार्जमध्ये FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक, 3 महिन्यांसाठी Apollo 24|7 Circle सब्सक्रिप्शन, Free Hello Tunes आणि Wynk Music सब्सक्रिप्शन मिळतं.

नोट: ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असू शकते. त्यामुळे लवकरच हिचा लाभ घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here