जर तुम्ही स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Oppo ने आपला नवीन A3 5G लाँच केला आहे. कंपनीने हा फोन मिलिटरी ग्रेड रेझिस्टन्स आणि पाणी आणि धुळीपासून संरक्षण करणाऱ्या रेटिंगसह सादर केला आहे. यामध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6300 चिपसेट, 12 जीबी पर्यंतची रॅम, 50 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, 5100mAh ची बॅटरी यांसारखे अनेक शक्तिशाली स्पेसिफिकेशन आहेत. चला, पुढे Oppo A3 5G ची किंमत आणि वैशिष्ट्ये सविस्तरपणे जाणून घेऊ या.
Oppo A3 5G ची किंमत आणि उपलब्धता
Oppo A3 5G ओशन ब्लू आणि नेबुला रेड या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या 6GB रॅम + 128GB या एकमेव स्टोरेज पर्यायाला 15,999 रुपयांमध्ये लाँच केले गेले आहे.
डिव्हाईसला सध्या ग्राहक Oppo इंडिया ई-स्टोअरवरून खरेदी करू शकतात.
ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास कंपनी वनकार्ड, बँक ऑफ बडोदा आणि एसबीआय बँक कार्ड व्यवहारांवर 10 टक्क्यांपर्यंत झटपट बँक सूट ही देत आहे.
Oppo A3 5G चे स्पेसिफिकेशन
6.67 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले
डायमेंसिटी 6300 SoC
6 जीबी LPDDR4X रॅम
6 जीबी व्हर्च्युअल रॅम
128 जीबी स्टोरेज
50MP रिअर कॅमेरा
5MP फ्रंट कॅमेरा
5,100 एमएएच बॅटरी
45W SUPERVOOC चार्जिंग
मिलिटरी ग्रेड रेझिस्टन्स
- डिस्प्ले: Oppo A3 5G मध्ये 6.67 इंचाचा HD + LCD डिस्प्ले मिळत आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि त्याचा ब्राईटनेस जास्तीत जास्त 1,000 निट्स पर्यंत आहे.
- प्रोसेसर: Oppo A3 5G मोबाईल फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 SoC लावण्यात आला आहे. याला 1,072 MHz वर क्लॉक केलेल्या Mali-G57 MC2 GPU सोबत प्रवेश मिळाला आहे.
- स्टोरेज आणि रॅम: नवीन Oppo मोबाईल फोनमध्ये 6जीबी LPDDR4X रॅम, 6जीबी व्हर्च्युअल रॅमची सुविधा आहे. म्हणजेच वापरकर्ते 12जीबी रॅमची शक्ती वापरू शकतील. यासोबतच 128GB eMMC 5.1 स्टोरेज देखील यामध्ये समाविष्ट आहे.
- कॅमेरा: स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना एलईडी फ्लॅशसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा AF प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलची पोर्ट्रेट लेन्स बसवण्यात आली आहेत. त्याचवेळी, फ्रंट कॅमेरा पंच-होल लेआऊटमध्ये 5 मेगापिक्सेलचा सेन्सर उपलब्ध आहे.
- बॅटरी आणि चार्जिंग: Oppo A3 5G डिव्हाईस 5,100 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि हा 45W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करतो.
- कनेक्टिव्हिटी: कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल-सिम, 5G, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.3, यूएसबी टाईप-सी आणि 3.5 मिमी जॅक यांसारखे फिचर्स जोडण्यात आले आहेत.
- इतर: सुरक्षिततेसाठी हा स्मार्टफोन मिलिटरी-ग्रेड शॉक रेझिस्टन्स (MIL-STD 810H) आणि काही लिक्विड रेझिस्टन्स तंत्रज्ञानासह येत आहे. यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस रेकग्निशन सपोर्ट देखील मिळत आहे.
- वजन आणि डायमेंशन: फोनचे डायमेंशन 165.7 × 76 × 7.7 मिमी आहे. तर त्याचे वजन सुमारे 187 ग्रॅम आहे.
- ऑपरेटिंग सिस्टम: नवीन Oppo A3 5G डिव्हाईस अँड्रॉईड 14 आधारित ColorOS 14.0.1 सोबत मिळून काम करतो.














