Samsung Galaxy Z Flip 6 आणि Z Fold 6 एफसीसी साईटवर झाला लिस्ट, मिळू शकतात हे फिचर्स

सॅमसंग येत्या महिन्यामध्ये आपला प्रीमियम फोल्ड स्मार्टफोन लाँच करू शकतो. यात Samsung Galaxy Z Flip 6 आणि Samsung Galaxy Z Fold 6 येण्याची शक्यता आहे. परंतु अजून ब्रँडची घोषणा होण्याची वाट पाहावी लागणार आहे याआधी एफसीसी सर्टिफिकेशन वेबसाईटवर गॅलेक्सी झेड फ्लिप 6 आणि गॅलेक्सी झेड फोल्ड 6 च्या जागतिक व्हेरिएंट समोर आले आहेत. ज्यात काही प्रमुख फिचर्सची माहिती मिळाली आहे. चला, पुढे याची माहिती जाणून घेऊया.

Samsung Galaxy Z Flip 6 एफसीसी लिस्टिंग

 • एफसीसी डेटाबेसवर सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 6 चे जागतिक व्हेरिएंटचा मॉडेल नंबर SM-F741B आहे.
 • फोनमध्ये ड्युअल बॅटरी असण्याची माहिती मिळाली आहे, ज्याचा मॉडेल नंबर EB-BF741ABY आणि EB-BF742ABY आहे.
 • मोबाईलमध्ये 1097mAh आणि 2790mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
 • एफसीसी प्लॅटफॉर्मवर चार्जिंग एडॉप्टरचा मॉडेल नंबर EP-TA800 आहे जो 25W USB-C आहे.
 • लिस्टिंगनुसार सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 6 वायरलेस चार्जिंग आणि वायरलेस पावर शेअरिंगला सपोर्ट असेल.
 • कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, WiFi, ब्लूटूथ आणि NFC ला सपोर्ट मिळेल.

Samsung Galaxy Z Fold 6 एफसीसी लिस्टिंग

 • सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 6 जागतिक ऑप्शनने पण एफसीसी सर्टिफिकेशनवर उपस्थिती दर्शविली आहे.
 • मोबाईलचा मॉडेल नंबर एफसीसी साईटवर SM-F956B समोर आला आहे.
 • लिस्टिंगमध्ये माहिती मिळाली आहे की यात 25W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट असेल.
 • हा मोबाईल पण 5G, WiFi, ब्लूटूथ, NFC सारखे अनेक कनेक्टिव्हिटी फिचर्ससह लाँच होऊ शकतो.

Samsung Galaxy Z Flip 6 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

 • डिस्प्ले: Samsung Galaxy Z Flip 6 मध्ये मोठा कव्हर आणि इनर डिस्प्ले असण्याची माहिती मिळाली आहे. फोनची कव्हर स्क्रीन 3.9 इंचापर्यंत असू शकते.
 • स्टोरेज: या फ्लिप मोबाईलमध्ये 8GB आणि 12GB पर्यंत रॅम सादर केली जाऊ शकते.
 • बॅटरी: बॅटरी पाहता हा नवीन सॅमसंग फ्लिप फोन 4000mAh ची बॅटरीसह ठेवला जाऊ शकतो. तर चार्जिंगसाठी 25 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.
 • कॅमेरा: Samsung Galaxy Z Flip 6 5G मध्ये युजर्सना 50MP चा प्रायमरी लेन्स मिळण्याची शक्यता आहे.
 • ओएस: Samsung Galaxy Z Flip 6 नवीन एआय टेक्नॉलॉजीसह अँड्रॉईड 14 आधारित वन युआयवर काम करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here