Infinix Zero 40 5G च्या लाँच पूर्वी संपूर्ण तपशील आले समोर, फोन जागतिक रिटेल साईटवर झाला सूचीबद्ध

Infinix आजकाल आपली Zero 40 सीरीज वाढवण्यावर काम करत आहे. या अंतर्गत Infinix Zero 40 5G डिव्हाईस येत्या काही दिवसात लाँच होण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी लाँच होण्यापूर्वी हा मोबाईल जागतिक रिटेलर वेबसाईटवर दिसला आहे. यामध्ये त्याची प्रमुख स्पेसिफिकेशन, फोटो आणि किंमत देखील समोर आली आहे. चला, पुढे या फोनमध्ये काय-काय मिळणार आहे याची माहिती जाणून घेऊया.

Infinix Zero 40 5G चे स्पेसिफिकेशन (अपेक्षित)

जागतिक स्तरावर मलेशियामध्ये आगामी Infinix Zero 40 5G स्मार्टफोनची प्री-रिटेलर सूची समोर आली आहे.

  • डिस्प्ले: माहितीनुसार Infinix Zero 40 5G मध्ये 6.78 इंचाचा कर्व्ह-एज ॲमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. त्यावर 1080 x 2436 चे पिक्सेल रिझोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट मिळण्याची आशा आहे.
  • प्रोसेसिंग: डिव्हाईसला उर्जा देण्यासाठी ब्रँड त्यात MediaTek Dimensity 8200 Ultimate चिपसेट स्थापित करू शकतो. जे वापरकर्त्यांना गेमिंगसह इतर ऑपरेशन्समध्ये शक्तिशाली अनुभव देण्यास सक्षम असेल.
  • स्टोरेज आणि रॅम: मोबाईल मध्ये 12GB रॅम + 256GB इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. एवढेच नाही तर यामध्ये 12GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्टही असेल. ज्याच्या मदतीने एकूण 24GB रॅम वापरता येईल.
  • कॅमेरा: फोटोग्राफीसाठी Infinix Zero 40 5G मध्ये 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर मागील पॅनलमध्ये OIS तंत्रज्ञान असलेला 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी, 50 मेगापिक्सेलची अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 2 मेगापिक्सेलच्या इतर लेन्स स्थापित केल्या जाऊ शकतात.
  • बॅटरी आणि चार्जिंग: पॉवर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. ही मोठी बॅटरी चार्ज करण्यासाठी 45W वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • ऑपरेटिंग सिस्टम: हा आगामी मोबाईल XOS 14.5 इंटरफेस सोबत अँड्रॉईड 14 वर काम करू शकतो. याला 2 अँड्रॉईड ओएस अपग्रेड आणि 3 वर्षांची सुरक्षा अपडेट मिळतील असे म्हटले जाते.
  • इतर: फोन मध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, रिमोट कंट्रोल क्षमतेसाठी IR ब्लास्टर आणि पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP54 रेटिंग दिली जाऊ शकते.
  • डायमेशन: लीकनुसार Infinix Zero 40 5G फोन 164.31 x 74.47 x 7.9 मिमी चा असू शकतो.

Infinix Zero 40 5G ची किंमत

जागतिक रिटेल वेबसाईटवर सूचीबद्ध झालेल्या Infinix Zero 40 5G ची किंमत 1,699 MYR म्हणजेच सुमारे 32,000 रुपये ठेवली जाऊ शकते. हा तीन रंगांमध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये रॉक ब्लॅक, मूव्हिंग टायटॅनियम आणि व्हायलेट गार्डन या रंगांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here