Redmi Note 14 सीरीजचे चीनमध्ये लाँच कंफर्म, ब्रँडने शेअर केला टिझर

शाओमीने आपल्या रेडमी नोट 14 सीरीजच्या लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या अधिकृत चीन वेबसाईटवर फोनचा टिझर लिस्टेड आहे. ज्यात डिझाईन पण दिसत आहे. तसेच या सीरीजमध्ये Redmi Note 14, Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro Plus 5G लाँच होईल. परंतु अजून लाँचची तारीख समोर आली नाही, मात्र मोबाईल पुढच्या आठवड्यात येईल. चला, पुढे तुम्हाला या लाईनअप बाबत सविस्तर सांगतो.

Redmi Note 14 सीरीज टिझर

  • तुम्ही खाली दिलेल्या टिझर फोटोमध्ये पाहू शकता की ब्रँडने दोन स्मार्टफोनला दाखविले आहे. हा रेडमी नोट 14 प्रो आणि नोट 14 प्रो प्लस होऊ शकतात.
  • दोन्ही डिव्हाईसमध्ये बॅक पॅनलवर कर्व स्क्वायर शेपचा कॅमेरा पाहायला मिळतो तसेच फोनचा पॅनल पण कर्व ठेवला गेला आहे.
  • दोन्ही मोबाईलमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश दिसून येत आहे.
  • नोट 14 प्रो प्लस मध्ये जिथे कॅमेरा मॉड्यूलमध्ये कॅमेरा लेन्स आहेत. तसेच, प्रो मॉडेलमध्ये वेगवेगळे कॅमेरा रिंग आहेत.
    ब्रँडने अँटी-फॉल, वॉटरप्रूफ आणि सर्व्हिस गॅरेंटीवर ध्यान केंद्रित केल्यावर जोर दिला आहे.
  • Redmi Note 14 सीरीज फोनला पाणी आणि धूळीपासून वाचणारी IP68 रेटिंगसह आणला जाईल.
  • एक मॉडेल ग्रीन आणि एक ग्रे शेड मध्ये टिझ करण्यात आला आहे. परंतु लाँचच्या वेळी या कलरला नावाने वेगळे होऊ शकतात.

Redmi Note 14 सीरीज स्पेक्स

ग्रीन कलरमध्ये समोर आलेल्या नोट 14 प्रो+ मध्ये प्रायमरी कॅमेऱ्यासाठी OIS आणि f/1.6 अपर्चर असलेला 50MP कॅमेरा दाखवण्यात आला आहे. यात 60mm f/2.2 मिड-फोकस लेन्स आहे. तर इतर नोट डिव्हाईसमध्ये OIS सह 50MP AI कॅमेरा दिसत आहे. सध्या अधिकृत स्तरावर याची माहिती मिळाली आहे. तर तुम्ही संभावित माहिती पुढे पाहू शकता.

Redmi Note 14 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • रेडमी नोट 14 या लाईनअपचा सर्वात स्वस्त मॉडेल असेल. रिपोर्टनुसार यात 1.5K अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. जो याच्या मागच्या 13 व्हर्जनच्या FHD पॅनलपेक्षा चांगला होईल.
  • फोटोग्राफीसाठी नोट 14 5G मध्ये मागे 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप होण्याची चर्चा आहे.
  • मोबाईलमध्ये ग्राहकांना संभवतः MediaTek Dimensity 6100+ चिपसेट दिला जाऊ शकतो.

Redmi Note 14 Pro आणि Plus चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro Plus मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह कर्व्ड 1.5K OLED डिस्प्ले लावला जाऊ शकतो.
  • दोन्ही मध्ये बॅक पॅनलवर 50-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल.
  • प्रो मॉडेलमध्ये कंपनी द्वारे क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 3 चिप दिला जाऊ शकतो. तर प्रो+ मध्ये MediaTek Dimensity 7350 चिपसेट मिळण्याची संभावना आहे.
  • लीक आणि लिस्टिंगनुसार यामधील कोणात्याही एका प्रो मॉडेलमध्ये 90W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here