मोटोरोला आपल्या मोटो जी7 सीरीजच्या निर्मितीत व्यस्त आहे. कपंनी या सीरीज अंतर्गत 4 नवीन फोन आणण्याची तयारी करत आहे ज्यात मोटो जी7 सोबतच मोटो जी7 प्ले, मोटो जी7 पावर आणि मोटो जी7 प्लस असतील. काही दिवसांपूर्वीच या चारही फोन्सच्या रेंडर ईमेज इंटरनेट वर लीक झाल्या होत्या ज्यामुळे सर्व स्मार्टफोंसच्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली होती. तर आज मोटो जी7 पावर चीनी बेंचमार्किंग साइट वर पण लिस्ट केला गेला आहे.
मोटो जी7 पावर बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचच्या या लिस्टिंग वरून समजले आहे की मोटो जी7 पावर कंपनी लेटेस्ट एंडरॉयड वर्जन 9.0 पाई वर सादर होईल सोबत हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसर तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 625 चिपसेट वर चालेल. गीकबेंचच्या लिस्टिंग मध्ये हा फोन 4जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे.

गीकबेंच वर मोटो जी7 पावर ला सिंगल-कोर मध्ये 1286 स्कोर मिळाला आहे तसेच मल्टी-कोर मध्ये या फोनला 5443 स्कोर देण्यात आला आहे. मोटो जी7 पावर चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 32जीबी तसेच 64जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच फोटोग्राफी साठी मोटो जी7 पावर मध्ये 12-मेगापिक्सलचा रियर तर 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल.
मोटो जी7 पावर संबंधित या लीक मध्ये सांगण्यात आले आहे की मोटोरोला आपल्या या फोन मध्ये नावानुरूपच 5,000एमएएच ची मोठी व दमदार बॅटरी देईल. तसेच या फोन मध्ये 6.22-इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वी मोटो जी7 पावर अमेरिकी वेबसाइट एफसीसी वर एक्सटी1955-4 मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला होता.














