नोकियाचे स्मार्टफोन्स बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबल यावर्षी आपले अनेक स्मार्टफोन्स सादर करण्याची योजना बनवत आहे. नुकताच 91मोबाईल्स ने नोकिया 8.1 प्लसचा एक्सक्लूसिव 360 डिग्री वीडियो आणि ईमेज शेअर केल्या होत्या. आता माहिती येत आहे कि कंपनी नोकिया 6 (2019) ज्याला नोकिया 6.2 नाव दिले जाऊ शकते यावर्षी सादर करू शकते. डिवाइस या महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारी मध्ये सादर केला जाऊ शकतो. नोकिया लीक्स नावाच्या एका नवीन टिप्सटर ने नोकिया 6 (2019) ची माहिती दिली आहे.
टिप्सटर ने केलेल्या ट्विटर मध्ये नोकिया 6 (2019) च्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. त्यानुसार नोकिया 6 (2019) मध्ये 6.2-इंच डिस्प्ले आणि नवीन ट्रेंड वाला डिस्प्ले होल सेल्फी कॅमेरा असेल. स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 632 एसओसी सह सादर केला जाऊ शकतो. तसेच डिवाइस मध्ये 4जीबी रॅम व 6जीबी रॅमचा ऑप्शन असेल. इतकेच नव्हे तर डिवाइस मध्ये जेसिसचे दोन 16-मेगापिक्सलचे रियर कॅमेरा असतील आणि हा ओजो ऑडियोला सपोर्ट करेल.
Nokia 6.2 (6 2019): 6.2-inch display with camera hole-punch, Snapdragon 632, 4/6GB RAM, 16MP Dual-rear Zeiss Camera,OZO Audio, First market China. Coming Jan end/Feb 2019.
— Nokia_Leaks (@LeaksNokia) January 10, 2019
याव्यतिरिक्त टिप्सटर ने सांगितले कि नोकिया 6 (2019) सर्वात आधी चीन मध्ये सादर केला जाईल जो जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरवातीला सादर केला जाऊ शकतो.
नुकत्याच समोर आलेल्या नोकिया 8.1 प्लस बद्दल बोलायचे तर यात एक मोठा डिस्प्ले असेल, ज्यात सेल्फी कॅमेरासाठी डावीकडे एक होल असेल, जसा याआधी सॅमसंग आणि हुआवाई च्या स्मार्टफोन्स मध्ये आपण बघितला आहे. पंच होल डिजाइन मुळे स्मार्टफोन मध्ये साइड आणि वर बेजल खूप कमी दिसत आहेत. तसेच खालच्या बाजूला नोकियाची ब्रॅण्डिंग दिसत आहे. डिस्प्लेची साइज पाहता यात 6.22-इंचाची स्क्रीन असेल जी आपण अपकमिंग मोटोरोला पी40 मध्ये पाहिली आहे.
तसेच नोकिया 8.1 प्लसच्या वरच्या बाजूला 3.5एमएम ईयरफोन जॅक असेल जो आईंक कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोन्स मध्ये देणे बंद केले आहे. तसेच उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण दिसत आहे. तसेच खाली यूएसबी टाइप सी पोर्ट, स्पीकर व माइक दिसत आहे. जर मागील बाजू पाहता यात ग्लास पॅनल दिसत आहे, ज्यात नोकियाची ब्रॅण्डिंग आहे.














