शाओमी ने गली महिन्यात आपल्या रेडमी ब्रँड मध्ये पहिला स्मार्टफोन रेडमी नोट 7 लॉन्च केला होता. तसेच अनेक दिवसांपासून समोर येत आहे कि कंपनी याच सीरीज मध्ये रेडमी नोट 7 प्रो लॉन्च करण्याची योजना बनवत आहे. 91मोबाईल्स ने एक्सक्लूसिव माहिती दिली होती कि शाओमी पुढल्या महिन्यात 12 फेब्रुवारीला भारतात रेडमी नोट 7 (रेडमी नोट 7 प्रो) लॉन्च करू शकते. आता रेडमीच्या जनरल मॅनेजर लू वेइबिंग ने अपकमिंग फोन बद्दल माहिती दिली आहे.
चीनच्या माइक्रोब्लॉगिंग साइट वीबो वर रेडमीच्या जनरल मॅनेजर लू वेइबिंग ने एक पोस्ट मधून खुलासा केला आहे कि कंपनी मिड-रेंज सेगमेंटच्या पुढे जाऊन फ्लॅगशिप सेगमेंट मध्ये जाण्याची योजना बनवत आहे. या अंतर्गत अपकमिंग डिवाइसेस फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सह लॉन्च केले जाऊ शकतात. वेबिंग ने अलीकडेच शाओमीच्या शेनजेन आरएंडी इंस्टिट्यूट मध्ये आपल्या सोबत रेड्मी क्रू चा एक फोटो शेयर केला होता, ज्यात त्यांना चर्चा करताना दाखवण्यात आले होते.
विशेष म्हणजे कंपनी ने चीन मध्ये लॉन्च झालेल्या रेडमी नोट 7 मध्ये सॅमसंग सेंसर वापरला होता. पण भारतात येणाऱ्या नोट 7 प्रो मध्ये सोनी आईएमएक्स586 इमेज सेंसर वाला 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. शाओमी ने आपल्या सब-ब्रँड रेडमी मध्ये हा डिवाइस लॉन्च केला होता.
रेडमी नोट 7 स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे तर यात f/1.8 अपर्चर सह 48-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी साठी यात 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. शाओमी रेडमी नोट 7 3जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम आणि 64जीबी आणि 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरियंट सह येतो.














