Huawei ने गेल्याच आठवड्यात ऑफिशियली स्पेनच्या मार्केट मध्ये आपला P Smart Z स्मार्टफोन सादर केला होता. आता इंडस्ट्री सोर्स ने 91मोबाईल्सला याची माहिती मिळाली आहे कि कंपनी हा स्मार्टफोन लवकरच इंडियन मार्केट मध्ये सादर करण्याची योजना करत आहे. विशेष म्हणजे P Smart Z च्या लॉन्च सोबत हुआवई कंपनीने पण पॉप-अप सेल्फी कॅमेरा वाले स्मार्टफोन सेग्मेंट मध्ये एंट्री घेतली आहे.
Huawei P Smart Z चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.59-इंचाच्या फुलएचडी+ अल्ट्रा फुलव्यू डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 9 पाई ओएस सह ईएमयूआई 9 वर सादर केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या किरीन 710एफ चिपसेट वर चालतो.
हे देखील वाचा: Huawei Y9 Prime (2019) पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर सह झाला सादर
हुआवई ने P Smart Z 4जीबी रॅम वर सादर केला आहे. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. हुआवई चा हा फोन डुअल सिम सोबत 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 4,000एमएएम च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.
Huawei P Smart Z ची सर्वात मोठी खासियत अशी कि हा कंपनीचा पहिला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला फोन आहे. सर्वात आधी याचा फोटाग्राफी सेग्मेंट पाहता हा एफ/2.2 अपर्चर वाल्या 16-मेगापिक्सलच्या पॉप-अप फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो सेल्फीची कमांड देताच फोन बॉडी बाहेर येतो आणि फोटो क्लिक करतो.
तसेच फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा एलईडी फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबतच एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे. Huawei ने P Smart Z चा कॅमेरा सेटअप एआई टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे जो स्वतः फोटोग्राफी साठी आवश्यक सर्व आस्पेक्ट ठरवून चांगले फोटो कॅप्चर करतो.














