Nokia 9.3 PureView च्या डिजाईनचा खुलासा, या फोन मध्ये मिळेल 108 MP + 64 MP चा क्वॉड कॅमेरा

Nokia बाबत जेव्हापासून बातमी आली आहे कि कंपनीचा फ्लॅगशिप डिवाईस Nokia 9.3 PureView ब्रँडचा पहिला असा स्मार्टफोन असेल ज्यात 108 मेगापिक्सल आणि 64 मेगापिक्सलचे कॅमेरा सेंसर दिले जातील, तेव्हापासून फक्त नोकिया फॅन्सच नाही तर इतर टेक लवर्स पण या फोनची वाट बघत आहेत. कोरोना वायरस मुळे नोकियाचे अनेक स्मार्टफोन उशिरा लॉन्च होत आहेत. चर्चा आहे कि या महिन्यात Nokia आपले काही स्मार्टफोन्स सादर करेल. त्यातील एक Nokia 9.3 PureView संबंधित महत्वाची बातमी समोर येत आहे, ज्यात फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे.

Nokia 9.3 PureView चा क्लियर केस इंटरनेट वर वायरल होत आहे जो नोकिया पावर यूजर वेबसाइटने शेयर केला आहे. नवीन रिपोर्ट मध्ये हा केस शेयर करून दावा केला गेला आहे कि नोकिया 9.3 प्योरव्यूचे काम जवळपास पूर्ण झाले आहे आणि डिवाईसची फाईनल टेस्टिंग सुरु होणार आहे. फोनचे प्रोडक्शन सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरवातीला सुरु होईल आणि कंपनी वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत हा फोन बाजारात आणेल.

लुक व डिजाईन

Nokia 9.3 PureView बद्दल बोलले जात आहे कि हा फोन बेजल लेस डिजाईन वर बनेल तसेच फ्रंट पॅनल वर डिस्प्ले चारही बाजूंना कडेशी जोडलेला असेल. फोन मध्ये कोणतीही नॉच नसेल पण सेल्फी कॅमेऱ्यासाठी यात पंच-होल डिजाईन दिली जाईल. फोटो मध्ये फोनचा बॅक पॅनल वर कर्व्ड दिसत आहे ज्या वर वर्तुळाकार क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. या सकुर्लर रिंगच्या खाली फ्लॅश लाईट आहे.

नोकिया 9.3 प्योरव्यू च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही. इथे खाली वर्टिकल शेप मध्ये Nokia ची ब्रँडिंग आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन दिसत आहे. अशा आहे कि हा फोन साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल. फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सह 3.5एमएम जॅक पण मिळू शकतो.

Nokia 9 Pureview

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

Nokia 9.3 PureView बद्दल बोलले जात आहे कि हा फोन ओएलईडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. लीकनुसार फोनच्या कॅमेरा सेटअप मध्ये 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा मिळेल जो सॅमसंग सेंसर असेल. तसेच 64 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा दिला जाईल. नोकियाचा हा फोन पण कार्ल जेसिस लेंस इफेक्ट सह लॉन्च केला जाईल.

नोकिया 9.3 प्योरव्यू बद्दल आशा व्यक्त केली जात आहे कि हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. अशा आहे कि हा फोन 8 जीबी रॅमला सपोर्ट करेल. कदाचित नोकिया आपला फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात आणेल याची शक्यता नाकारता येत नाही. फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्स किंवा लॉन्च संबंधित नवीन माहिती मिळताच वाचकांपर्यंत पोचवली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here