रियलमीने काही दिवसांपूर्वी चीन मध्ये आपला पहिला पॉप-सेल्फी कॅमेरा असेलला Realme X हँडसेट लॉन्च केला होता. डिवाइस लॉन्च झाल्यांनतर भारतात याच्या उपलब्धतेबद्दल चर्चा सुरु झाली होती. आता कंपनी हा फोन भारतात लॉन्च कारण्यासाठी तयार आहे. फोन बद्दल आता पर्यंत बोलले जात होते कि भारतात हा त्याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च केला जाईल ज्या स्पेसिफिकेशन्स सह हा चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे. पण कंपनीने त्यास नकार दिला आहे.
कंपनीने अलीकडेच म्हटले आहे कि रियलमी एक्स त्याच स्पेसिफिकेशन्स सह भारतात येईल ज्यांच्या सह चीन मध्ये लॉन्च केला गेला होता असे नाही. रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी ट्विटर वर या फोनचे काही डीटेल्स शेयर केले आहेत.
#realmeX may not necessarily launch at the same specs in India.
We are planning to have an #realmeXIndian version and
pricing maybe around 18k.Apart from Garlic and Onion, ?
we will also have one more special variant for India.?
RT and Guess?— Madhav X (@MadhavSheth1) May 18, 2019
ट्वीट मध्ये त्यांनी फोनच्या स्पेसिफिकेशन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही, पण हा फोन भारतात चाइनीज वेरियंट पेक्षा वेगळ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सह येऊ शकतो या दिशेने इशारा केला आहे.
हे देखील वाचा: 48MP कॅमेऱ्यासह 28 मे ला समोर येईल Redmi K20 स्मार्टफोन, करेल सर्वांची सुट्टी
तसेच माधव यांनी अशी पण हिंट दिली आहे कि Realme X Garlic आणि Onion वेरिएंट व्यतिरिक्त एका स्पेशल वेरिएंट भारतात सादर केला जाईल. सोबत डिवाइसच्या किंमतीबद्दल त्यांनी लिहिले आहे कि Realme X ची किंमत 18,000 रुपये असेल.
Realme X चे स्पेसिफिकेशन्स
Realme X चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.53-इंचाचा फुल एचडी+ एज-टू-एज ऐमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 एसओसी आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला 16-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. मागे डुअल कॅमेरा आहे. यात एक सेंसर 48-मेगापिक्सलचा आणि दुसरा डेप्थ सेंसर 5-मेगापिक्सलचा आहे.
हे देखील वाचा: Samsung Galaxy A9 च्या किंमतीत 8,000 रुपयांची कपात, फक्त 24,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला 8जीबी रॅम वाला हा फोन
Realme X मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर पण देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये एआई हाइपरबूस्ट टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,765एमएएच ची बॅटरी VOOC फ्लॅश चार्ज 3.0 सह येते. फोन कलरओएस वर चालतो जो एंड्रॉइड 9 पाई बेस्ड आहे.














