प्रतीक्षा संपली! 5जी भारतात लाँच! आता रॉकेट स्पीडनं चालेल इंटरनेट

5G Launch in India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज IMC 2022 म्हणजे इंडिया मोबाइल कांग्रेसच्या मंचावरून भारतात 5जी सर्व्हिस लाँच केली आहे. 5जी ट्रायल्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर भारत सरकारकडून Reliance Jio, Airtel आणि Vi सारख्या टेलीकॉम कंपन्यांना 5G Spectrum चं वाटप करण्यात आलं होतं, आजच्या लाँच नंतर या कंपन्या देशात आपली सेवा सुरु करू शकतील. 5G Services मध्ये मजबूत 5G Network सोबतच cloud gaming, AR/VR technology आणि IoT मध्ये आमूलाग्र बदल दिसेल परंतु सर्वसामान्य जनतेला ज्या गोष्टीची सर्वात जास्त प्रतीक्षा आहे ती म्हणजे सुपर फास्ट 5G Internet! 5जी लाँचनंतर भारतात इंटरनेट आता रॉकेट स्पीडनं चालेल असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

5G Services Launched in India by PM Modi

नवी दिल्लीतील प्रगती मैदानमध्ये आयोजित आयएमसी 2022 इव्हेंटच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी देशातील तिन्ही प्रमुख टेलीकॉम कंपन्या एयरटेल, जियो आणि वीआयच्या 5जी सर्विसचा डेमो देखील घेतला आहे. या दरम्यान मोदींनी 5जी अँब्युलन्स आणि 5जी एज्युकेशन सारख्या सर्विसेसची माहिती जाणून घेतली त्याचबरोबर ऑग्मेंटेड रियलिटी वर्चुअल रियलिटीचा अनुभव देखील घेतला. इतकेच नव्हे तर 5जी टेक्नोलॉजीच्या मदतीनं पंतप्रधानांनी दिल्लीमध्ये बसून स्वीडनमध्ये ठेवण्यात आलेली कार देखील चालवून दाखवली.

5जीचा फायदा

5जी एक नेक्स्ट जेनरेशन मोबाइल कम्यूनिकेशन नेटवर्क आहे जो सध्याच्या 4जी च्या तुलनेत मोठा आणि वेगवान असेल. 5जी नेटवर्क फक्त मोबाइल स्मार्टफोंस पर्यंत मर्यादित राहणार नाही तर सुपरफास्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासह याचा फायदा क्लाउड गेमिंग (cloud gaming), एआर/वीआर टेक्नॉलजी (AR/VR technology), आयओटी म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) इत्यादीमध्ये होईल.

किती फास्ट असेल 5G

5G बद्दल लोकांच्या मनात सर्वात जास्त उत्सुकता हिच्या स्पीडमुळे आहे. सध्याच्या 4G चा टाॅप स्पीड 100mbps म्हणजे 100 मेगाबिट्स प्रति सेकंड आहे. तर 5G मध्ये हा स्पीड थेट 10GBPS (10 जीबी प्रति सेकंड) होईल. अर्थात 4जी पेक्षा 100 पट जास्त. तुम्हाला आठवत असेल की 3G नेटवर्कवर हा स्पीड 7.2mbps होता. आणि तरी सुद्धा जेव्हा 3जीची सुरुवात झाली होती तेव्हा मोबाइल युजर्स किती उत्साही होते. मग आता 5जी स्पीड जेव्हा तुमच्या स्मार्टफोनमध्ये चालेल तेव्हा काय होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here