OPPO ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि कंपनी Under-Screen Camera असलेल्या स्मार्टफोन वर काम करत आहे आणि लवकरच हि टेक्नॉलॉजी जगासमोर येईल. तसेच काल शांघाई मध्ये आयोजित मोबाईल वर्ल्ड कॉग्रेसच्या मंचावरून जगातील पहिला अंडर-डिस्प्ले कॅमेरा असलेला फोन सादर केला आहे. आता पर्यंत वॉटरड्रॉप नॉच, पॉप-अप आणि पंच-होल डिस्प्ले मध्ये सेल्फी कॅमेरा दिला जात होता पण ओपोच्या या फोन मध्ये स्क्रीनच्या खाली कॅमेरा देण्यात आला आहे जो बाहेरून इनविजिबल म्हणजे अदृश्य असतो. Oppo ने हि अनोखी टेक्नॉलॉजी समोर आणून स्मार्टफोनच्या दुनियेत एक नवीन सुरवात केली आहे.
Oppo ने आपल्या या अनोख्या टेक्नॉलॉजीला Under-Screen Camera (USC) चे नाव दिले आहे. MWC Shanghai 2019 च्या मंचावरून कंपनीने आपला प्रोटोटाइप मॉडेल सादर केला आहे. हि टेक्नोलॉजी प्रदर्शित करत Oppo ने सांगितले आहे कि हि टेक्नॉलॉजी कस्टमाइज कॅमेरा मॉड्यूल सह काम करते जो एन्हांस्ड ट्रांसपॅरेंट पॅनल मटेरियलच्या खाली फिट केला गेला आहे. अंडर-डिस्प्ले कॅमेरा टेक्नॉलॉजी सह Oppo फोन ट्रूली फुल-स्क्रीन सह लॉन्च होतील.
OPPO's brand new solution for full-screen display – Under-screen Camera (USC) has just been unveiled here at #MWC19 Shanghai! ? #MoreThanTheSeen pic.twitter.com/c1FUEbXS0P
— OPPO (@oppo) June 26, 2019
असे करेल काम
हि टेक्नॉलॉजी असलेल्या Oppo स्मार्टफोन्स मध्ये सेल्फी कॅमेरा इनविजिबल असेल. हा फोन एक नव्हे तर दोन डिस्प्ले सह येईल. फोन डिस्प्ले खाली अजून एक डिस्प्ले असेल. खालच्या डिस्प्ले वरच सेल्फी कॅमेरा सेंसर असेल. कॅमेरा सोबतच या डिस्प्ले वर लाईट सेंसर पण दिला जाईल. हा लाईट सेंसर दोन्ही डिस्प्ले सह काम करेल. हि टेक्नॉलॉजी बऱ्याच अंशी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सारखी असेल.
Oppo Under-Screen Camera डिस्प्लेच्या खालून काम करेल आणि डिस्प्लेच्या बाहेरून यूजरला हा दिसणार नाही. टेक्नॉलॉजी अशी असेल कि सेल्फीची कमांड देताच खालच्या डिस्प्ले वरील कॅमेरा सेंसर चालू होईल आणि फोटो कॅप्चर करेल. कंपनीचा दावा आहे कि यूजरला सेल्फी घेण्यासोबतच फेस अनलॉक आणि वीडियो कॉलिंग सह इमर्सिव स्क्रीन व्यूइंगचा पण शानदार अनुभव मिळेल.
The algorithms behind our USC technology showcased at #MWC19 include haze removal, HDR and white balance resulting in a bezel-less phone, yet with a selfie camera that rivals current smartphones in the market today. #MoreThanTheSeen pic.twitter.com/yTpWgIMLmA
— OPPO (@oppo) June 26, 2019
Oppo नुसार हि टेक्नॉलॉजी ‘कंप्लीट फोटोग्राफी एक्सपीरियंस’ देईल जी आगामी काळात अजून एडवांस केली जाईल. कंपनी USC टेक्नॉलॉजीचा विस्तार करण्यासाठी काम करत आहे आणि हा कॅमेरा स्मार्ट ब्यूटी मोड आणि फोटो फिल्टर सारख्या फीचर्सला पण सपोर्ट करेल. कंपनीने कस्टमाइज कॅमेरा मॉड्यूल तयार केला आहे जो जोनिंग कंट्रोल फीचरच्या मदतीने जास्त प्रकाश कॅप्चर करतो. विशेष म्हणजे Oppo ने बेजल्स हटवण्यासोबत एचडीआर आणि चांगल्या फोटो क्वॉलिटी साठी व्हाइट बॅलेन्सचा वापर केला आहे.
Oppo MeshTalk
एमडब्ल्यूसी शांघाईच्या मंचावरून कंपनीने अजून एक नवीन टेक्नॉलजी ‘MeshTalk’ पण सादर केली आहे. या टेक्नोलॉजीच्या मदतीने Oppo फोन यूजर कोणत्याही सेल्युलर नेटवर्क, ब्लूटूथ आणि वाई-फाई कनेक्शनविना पण वॉयस कॉल करू शकतील. तसेच टेक्स्ट मेसेज पण पाठवता येतील. पण यासाठी तुम्ही ज्याला कॉल किंवा मेसेज करत आहेत तो फोन तुमच्या पासून 3 किलोमीटरच्या रेंज मध्ये असावा.














