नथिंगचा ब्रँड CMF आणू शकतो नवीन स्मार्टफोन, BIS साईटवर आला समोर

नथिंग आपल्या यूनिक डिझाईन आणि पावरफुल फिचर्ससाठी ज्ञात आहे. ब्रँडने आतापर्यंत आपल्या तीन स्मार्टफोन बाजारात आणले आहे. तसेच, आता या कंपनीचा सब ब्रँड CMF लवकर एक नवीन मोबाईल लाँच करू शकतो, कारण भारताच्या ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड सर्टिफिकेशन वेबसाईटवर नवीन डिव्हाईस स्पॉट झाला आहे. ज्याला सीएमएफ मानले जात आहे. चला, लिस्टिंगची माहितीमध्ये जाणून घेऊया.

CMF स्मार्टफोन BIS लिस्टिंग

  • भारताच्या बीआयएस वेबसाईटवर मॉडेल नंबर A015 सह एक सीएमएफ डिव्हाईस स्पॉट करण्यात आला आहे.
  • या डेटाबेसवर डिव्हाईसच्या नावाचा खुलासा झाला नाही,परंतु हा नथिंगचा सब ब्रँड सीएमएफचा स्मार्टफोन असू शकतो.
  • A015 मॉडेल नंबरला पहिले नथिंग फोन (3)साठी मानले जात आहे, परंतु आता या सीएमएफ ब्रँडिंग अंतर्गत लाँच केले जाऊ शकते.
  • माहितीसाठी CMF ने आतापर्यंत बाजारात स्वस्त स्मार्टवॉच, ईयरबड आणि नेकबँड सादर केले आहेत, यावरून असे वाटत आहे की नवीन फोन कमी बजेटमध्ये ग्राहकांसाठी नवीन पर्याय बनवेल.

CMF स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स (लीक)

याआधी एका टिपस्टरने एक्स प्लॅटफॉर्मवर नवीन सीएमएफ स्मार्टफोनची कॉन्सेप्ट डिझाईन आणि प्रमुख स्पेसिफिकेशन शेअर केले होते. ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.

  • डिझाईन: लीकनुसार डिव्हाईसमध्ये रिअर पॅनलवर एक कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश सुविधा दिली जाऊ शकते. हा ब्रश्ड प्लास्टिक बॉडी आणि क्रोम बटनसह येऊ शकतो. याच्या ऑरेंज, ब्लॅक आणि व्हाईट कलर ऑप्शनला पोस्टमध्ये शेअर केले गेले होते.
  • डिस्प्ले: टिपस्टरने डिव्हाईसबाबत सांगितले होते की हा 6.2 इंचाच्या डिस्प्लेसह येऊ शकतो.
  • प्रोसेसर: फोनमध्ये युजर्सना परफॉरमेंससाठी MediaTek Dimensity 7030 Pro चिपसेट मिळू शकते.
  • स्टोरेज: डेटा सेव्ह करण्यासाठी नवीन कमी किंमत असणाऱ्या फोनमध्ये ब्रँड 6GB रॅम +128GB पर्यंत स्टोरेज देऊ शकते.

CMF स्मार्टफोनची किंमत (लीक)

तुम्हाला सांगतो की ज्या टिपस्टरने डिव्हाईसचे स्पेसिफिकेशन सांगितले आहेत त्यानुसार हा डिव्हाईस €149 म्हणजे जवळपास 13,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच होऊ शकतो. परंतु अजून फक्त फोनचे सर्टिफिकेशन समोर आले आहे, या सर्व लीकची माहिती अचूक मानने खूप घाई होईल. आम्ही आणखी माहिती येताच तुमच्यासाठी नवीन अपडेट आणले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here