Jio Vs Airtel Vs BSNL: जाणून घ्या 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीत कोणत्या कंपनीचा प्लान आहे बेस्ट

काही दिवसांत इंडियन टेलीकॉम सेक्टरचा चेहरा अगदी बदलून गेला आहे. मार्केट मध्ये झालेल्या उलथापालथीमुळे मोबाईल ग्राहकांना मोठा झटका लागला आहे. एयरटेल, वोडाफोन आइडिया आणि जियोने आपले प्लान्स महग केले आहेत. तर BSNL ने पण आपल्या काही प्लान्स मध्ये बदल केले आहेत. अनेक दिवसांपासून मार्केट मध्ये स्वस्तात चांगले प्लान देण्याची सूर असलेली शर्यत आता संपली आहे. त्यामुळे आम्ही तुमची अडचण सोडवत आज एरयरटेल, रिलायंस जियो आणि BSNL च्या प्लान्स बद्दल माहिती देणार आहोत, ज्यांची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे तुम्हाला शानदार बेनिफिट्स पण देतील.

Airtel

298 रुपयांचा प्लान

28 दिवसांची वॅलिडिटी असलेल्या या प्लान मध्ये एयरटेल कडून रोज 2 जीबी इंटरनेट डेटा सह प्रतिदिन 100एसएमएस आणि अनलिमिटेड वॉयस कॉलिंग दिली जात आहे. तसेच या प्लान मध्ये एयरटेल एक्सट्रीम, विंक आणि हॅलो ट्यून्सचा फायदा मिळेल.

249 रुपयांचा प्लान

249 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर यात पण 28 दिवसांची वॅलिडिटी मिळते. प्लान मध्ये यूजर्सना प्रतिदिन 1.5जीबी डेटा सह अनलिमिटेड वॉयस कॉलिंगचा लाभ मिळेल. इतकेच नव्हे तर प्लान मध्ये 100 एसएमएस प्रतिदिन मिळेल. FASTag वर 150 रुपयांचा कॅशबॅक पण मिळेल.

219 रुपयांचा प्लान

या प्लान मध्ये मिळणारे सर्व लाभ 249 रुपयांच्या प्लान सारखे आहेत. पण या प्लान मध्ये यूजर्सना प्रतिदिन 1जीबी डेटा मिळेल. या प्लानची तुलना जियोच्या 149 रुपयांच्या प्लानशी करता येईल.

Reliance Jio

कंपनीने एक महिना वैधता असलेल्या प्लानच्या कॅटगरी मध्ये तीन टॅरिफ सादर केले आहेत. या कॅटगरी मध्ये 199 रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सना 1.5जीबी डेटा प्रति दिन, 249 रुपयांच्या प्लान मध्ये 2जीबी डेटा प्रति दिन आणि 349 रुपयांच्या प्लान मध्ये 3जीबी डेटा प्रतिदिन मिळेल. तसेच या तिन्ही प्लान मध्ये यूजर्सना जियो टू जियो नेटवर्क वर अनलिमिटेड फ्री कॉलिंग सह 1000 मिनिट्स IUC कॉलिंग मिळेल जे यूजर्स दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंग साठी वापरू शकतील. तसेच या तिन्ही प्लान मध्ये 28 दिवसांची वैधता मिळेल.

249 रुपयांचा प्लान

या प्लान मध्ये यूजर्सना 28 दिवसांची वैधता मिळते. तसेच प्लान मध्ये रोज 2GB डेटा पण दिला जात आहे. प्लान मध्ये यूजर्स जियो टू जियो नेटवर्क वर अनलिमिटेड फ्री कॉलिंग सह 1000 मिनिट्स IUC कॉलिंग मिळेल जी यूजर्स दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंग साठी वापरू शकतील.

199 रुपयांचा प्लान

199 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर यात मिळणाऱ्या सर्व सुविधा 249 रुपयांच्या प्लान प्रमाणेच आहे. पण या प्लान मध्ये 1.5जीबी डेटा मिळतो. प्लान मध्ये यूजर्सना जियो टू जियो नेटवर्क वर अनलिमिटेड फ्री कॉलिंग सह 1000 मिनिट्स IUC कॉलिंग मिळेल जी यूजर्स दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंग साठी वापरू शकतील.

149 रुपयांचा प्लान

Reliance Jio ने अलीकडेच आपला 149 रुपयांच्या प्रीपेड प्लान बदल करून सादर केला आहे. या प्लानची वैधता 24 दिवसांची आहे. पण यात अनलिमिटेड जियो-टू-जियो कॉलिंग, प्रति दिन 1 GB 4G डेटा आणि 100 SMS मिळतात. तसेच प्लान मध्ये जियोच्या प्रीमियम ऍप्सचे कॉम्प्लीमेंट्री सब्सक्रिप्शन पण मिळेल. तसेच दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंग साठी 300 आईयूसी कॉलिंग मिनिट्स मिळेल.

BSNL

200 रुपयांचा प्लान

या प्रीपेड प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 फ्री एसएमएस मिळतील. इतकेच नव्हे तर या प्लान मध्ये यूजर्सना 166.49 रुपयांचा टॉकटाइम मिळेल, ज्याच्या मदतीने दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंग करता येईल. या प्लान मध्ये यूजर्सना 28 दिवसांची वैधता मिळते.

220 रुपयांचा प्लान

183.44 रुपयांच्या टॉकटाइम सह येणाऱ्या या प्लान मध्ये BSNL ने अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 फ्री एसएमएस दिले आहेत. मिळणाऱ्या टॉकटाइमच्या मदतीने दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंग करता येईल. या प्लान मध्ये यूजर्सना 28 दिवसांची वैधता मिळते.

280 रुपयांचा प्लान

280 रुपयांचा प्लान सर्व सर्किल्स मध्ये उपलब्ध नाही. या प्लान मध्ये 234.29 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. तसेच या प्लान मध्ये पण यूजर्सना एसएमएएस आणि प्रतिदिन 1.5जीबी डेटा मिळत आहे. BSNL ने आपल्या प्रीपेड प्लान्स मध्ये वॉइस कॉलची रोजची लिमिट ठरवली आहे. आता कंपनीचे जास्तीत जास्त अनलिमिटेड प्रीपेड प्लान्स रोजच्या 250 मिनिट्स एफयूपी लिमिट सह येतात.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here