साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने अलीकडेच इंडियन मार्केट मध्ये गॅलेक्सी नोट 10 लाइट आणि गॅलेक्सी एस10 लाइट लॉन्च केले आहेत. तसेच कंपनी पुढल्या महिन्यात आपली नवीन फ्लॅगशिप सीरीज Galaxy S20 लॉन्च करणार आहे. तसेच कंपनी 14 फेब्रुवारीला फोल्डेबल Galaxy Z Flip पण लॉन्च करेल. Galaxy Z Flip बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. तसेच आता या डिवाइसचे ऑफिशियल रेंडर समोर आले आहेत.
WinFuture ने या स्मार्टफोनचे ऑफिशियल रेंडर्स लीक केले आहेत. तसेच डिवाइसची इतर माहिती पण शेयर केली आहे. हँडसेट बाजारातअनेक कलर ऑप्शन सह सादर केला जाईल. आशा आहे कि सॅमसंग आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या माध्यमातून मोटोरोलाच्या Moto Razr ला टक्कर देईल. दोन्ही स्मार्टफोन क्लॅमशेल स्टाइल मध्ये फोल्ड होतात. तसेच सॅमसंग आपला नवीन फोल्डेबल डिवाइस चार कलर ऑप्शन सह लॉन्च करू शकते. Galaxy Z Flip चे कलर ऑप्शंस सिल्वर, पर्पल, गोल्ड आणि ब्लॅक असू शकतात.
Galaxy Z Flip चे स्पेसिफिकेशन्स
Galaxy Z Flip बद्दल बोलायचे तर आता पर्यंत समोर आलेल्या काही रिपोर्ट्स मध्ये डिवाइस मधील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले आहे कि स्मार्टफोन 5G सपॉर्ट सह बाजारात येईल. यात क्वालकॉमचा लेटेस्ट स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर मिळेल. Galaxy Z Flip पाहता या फोन मध्ये फुल HD+ (2636 x 1080 पिक्सल) एमोलेड 6.7-इंचाचा इनफिनिटी-ओ डिस्प्ले असेल. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस प्रोसेसर सह 8जीबी रॅम आणि 256जीबी ची स्टोरेज दिली जाईल.
फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 12 MP डुअल पिक्सल f/1.8 + 12 MP कॅमेरा असेल. तसेच डिवाइस मध्ये फ्रंटला 10 MP डुअल पिक्सल कॅमेरा असेल. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 3300 mAh ची बॅटरी असेल. Samsung Galaxy Z Flip च्या किंमतीची माहिती पण समोर आली आहे. रिपोर्ट नुसार फोन 1500 euro (जवळपास 1,17,500 रुपये) मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच दुसऱ्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Galaxy S20 Ultra ची किंमत 1300 डॉलर ( 92,720 रुपये) असू शकते.
याव्यतिरिक्त Galaxy S20 सीरीज बद्दल बोलायचे तर काही दिवसांपूर्वी टिप्सटर Max Weinbach ने माहिती दिली होती कि या सीरीज मधील Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra चा सेल 6 मार्च पासून सुरु होऊ शकतो. रिपोर्ट्स मध्ये समोर आले आहे कि Galaxy S20 सीरीज सॅमसंग IP68 रेटिंग सह लॉन्च करू शकते, म्हणजे नवीन स्मार्टफोन वॉटरप्रूफ असतील.















