Airtel संपूर्ण 365 दिवस या प्लान्स मध्ये देत आहे बंपर डेटा आणि फ्री कॉलिंग, जाणून घ्या सर्वकाही

airtel च्या ऑफिस समोरील व्यक्ती

अलीकडेच समोर आलेल्या ट्रायच्या रिपोर्ट नुसार एयरटेल देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनली आहे. कंपनीकडे प्रीपेड प्लानची एक मोठी यादी आहे. एयरटेल कडे असे अनेक प्लान्स आहेत जे एका वर्षाच्या वैधतेसह येतात, ज्यात बंपर डेटा रोज दिला जातो. या प्लान्सची सर्वात खास बाब अशी कि एकदा रिचार्ज केल्यावर यूजर्सना वारंवार रिचार्जची कटकट राहत नाही. चला जाणून घेऊया Airtel च्या 365 दिवसांच्या टॉप 3 प्लान्स बाबत सर्वकाही.

Airtel चा 1498 रुपयांचा प्लान

एयरटेल एक वर्षाच्या अनेक प्लान ऑफर करते, पण यात सर्वात स्वस्त प्लान 1498 रुपयांचा आहे. यात 365 दिवस वैधता मिळते. यूजर्सना 24 जीबी डेटा मिळतो. प्लान मध्ये सर्व नेटवर्क्स वर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि 3600 SMS मिळतात. तसेच एयरटेल एक्सट्रीम प्रीमियम आणि ZEE5 चे सब्सक्रिप्शन मोफत मिळते.

Airtel चा 2,398 रुपयांचा प्लान

एयरटेलच्या या प्लानची वैधता पण 365 दिवस म्हणजे एक वर्ष आहे. या प्लान मध्ये यूजर्सना 1.5जीबी डेटा रोज दिला जातो. तसेच सर्व नेटवर्क वर कॉलिंगसाठी अनलिमिटेड मिनिट्स मिळतात. कॉलिंग मिनिट्ससाठी कोणतीही FUP लिमिट नाही. तसेच ग्राहकांना एकूण 100 एसएमएस पण रोज मोफत दिले जात आहेत. सोबत एयरटेल एक्सट्रीम प्रीमियम आणि ZEE5 चे सब्सक्रिप्शन मोफत मिळते.

Airtel चा 2,498 रुपयांचा प्लान

एयरटेलच्या या प्लानची वैधता पण 365 दिवस आहे. या पॅक मध्ये 2 जीबी डेटा रोज दिला जातो. एकूण 730 जीबी डेटा या प्लान मध्ये मिळतो. एयरटेलच्या या पॅक मध्ये प्रत्येक नेटवर्क वर लोकल, एसटीडी किंवा रोमिंग कॉल्स कोणत्याही FUP लिमिट मिळतात. ग्राहक रोज 100 मोफत एसएमएस पण पाठवू शकतात. तसेचज एयरटेल एक्सट्रीम प्रीमियम आणि ZEE5 चे सब्सक्रिप्शन मोफत मिळते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here