आता 47 चायनीज ऍप्स वर बंदी, PUGB समवेत 250 पेक्षा जास्त Apps वर पण टांगती तलवार, बघा संपूर्ण यादी

भारत सरकारने आईटी ऍक्टच्या सेक्शन 69ए अंतर्गत भारतात अजून 47 चीनी ऍप्स वर बंदी घातली आहे. याआधी सरकारने 59 चीनी ऍप्स बॅन केले होते, ज्यात लोकप्रिय ऍप टिकटॉक, शेयरइट आणि इतर अनेक ऍप्सचा समावेश होता. भारतात नवीन 47 प्रतिबंधित ऍप्सची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. अशाप्रकारे भारत सरकारने एकूण 106 ऍप्स भारतात प्रतिबंधित करण्यात आले आहेत. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार बॅन करण्यात आलेल्या ऍप्स मध्ये बऱ्याचश्या क्लोन ऍप्सचा समावेश आहे. म्हणजे आधी बॅन केलेल्या ऍप्स प्रमाणे ऍप बनवून हे ऍप्स सादर करण्यात आले होते. या ऍप्स वर यूजर्सच्या डेटा चोरीचा आरोप आहे.

चायनीज ऍप्स वर भारत सरकारची नजर आहे. या ऍप्सचा तपास करून सरकार यातील धोकादायक प्रोसेसेसची समीक्षा करत आहे. कोणत्याही परिस्थितीत या चायनीज ऍप्सच्या माध्यमातून देशाची सुरक्षा आणि भारतीय यूजरच्या डेटा सुरक्षेला धोका उदभवू नये असा सरकराचा प्रयत्न आहे.

पबजी वर टांगती तलवार

टिकटॉक सोबतच 59 ऍप बॅन केल्यावर सरकारची नजर 250 पेक्षा जास्त चीनी ऍप्स वर आहे. यात लोकप्रिय गेमिंग ऍप PUBG चा पण समावेश आहे. सराकार कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. काही रिपोर्ट्सनुसार एका अधिकाऱ्याने सांगितले आहे कि चीन ऍप्सची सतत तपासणी चालू आहे आणि त्यांना फंडिंग कुठून मिळत आहे याचा देखील शोध घेतला जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते काही ऍप्समुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे दिसून आले आहे तर काही ऍप डेटा शेयरिंग आणि गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत.

भारतीय सैन्याने बॅन केले हे ऍप्स

अलीकडेच भारतीय सैन्याने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी Facebook, Instagram, Truecaller, आणि PUBG सहित 89 ऍप वर बंदी घातली आहे. या ऍप्समुळे सौन्याला फक्त साइबर घुसखोरीची भीती नाही तर माहिती फुटण्याची पण चिंता आहे. सरकारने 59 चीनी ऍप्स वर बंदी घातली होती. पण आर्मीने बंदी घातलेल्या ऍप्सची यादी थोडी मोठी आहे आणि यात लोकप्रिय ऍप जसे कि फेसबुक, इंस्टाग्राम व डेटिंग ऍप टिंडरचा पण समावेश आहे.

प्रतिबंधित ऍप्सच्या यादीत TikTok, BigoLive आणि WeChat सह Truecaller, Zoom and Vigo Video ऍप्सचा समावेश आहे. भारतीय सैन्याच्या सैनिकांना Tinder, Bumble, Happn, TrulyMadly, Aisle, Coffee Meets Bagel, Couch Surfing आणि वीडियो स्ट्रीमिंग ऍप जसे कि Zoom, LiveMe, Vmate, आणि Uplive पण डीलिट करण्यास सांगण्यात आले आहे. इथे क्लिक करून संपूर्ण यादी बघा.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here