6 कॅमेरा, 6GB रॅम आणि 4500mAh बॅटरी सह लॉन्च झाले हे दोन दमदार स्मार्टफोन, Xiaomi-Realme ला देतील आव्हान

Infinix अनेक दिवसांपासुन देश विदेशात आपले नवीन स्मार्टफोन सादर करत आहे. तीच मालिका चालू ठेवत कंपनीने दोन नवीन फोन्स सादर केले आहेत. हे दोन्ही फोन्स Infinix Note 8 आणि Infinix Note 8i नावाने मार्केट मध्ये लॉन्च केले गेले आहेत. दोन्ही फोन्स डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत वेगवेगळे आहेत. Infinix Note 8 डुअल-पंच कटआउट सह येतो. तसेच Infinix Note 8i सिंगल पंच-होल सह सादर केला गेला आहे.

डिजाइन

डिजाइन पाहता Infinix Note 8 डुअल-पंच होल फ्रंट डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. हा कटआउट फोनच्या फ्रंटला पिल शेप मध्ये टॉप लेफ्टला आहे. फोनच्या Infinix Note 8 मध्ये फ्रंटला सिंगल पंच-होल टॉप लेफ्ट मध्ये आहे. सोबतच दोन्ही फोन मध्ये फ्रंटच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत. तर बॉटमला बारीक चिन पार्ट मिळेल. बॉटमला टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि स्पीकर ग्रिल आहे. मागे दोन्ही फोन मध्ये आयताकृती कॅमेरा शेप असलेला क्वाड कॅमेरा सेटअप आहे जो मागे टॉप लेफ्टला आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Infinix Note 8 मध्ये 6.95-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनचे रेजोल्यूशन 1640 x 720 पिक्सल आणि 480nits ची ब्राइटनेस आहे. Note 8i मध्ये 6.78-इंचाचा एचडी+ (1640 x 720 पिक्सल) डिस्प्ले आहे, ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 20.5:9 आणि 480 निट्स ब्राइटनेस आहे.

Infinix Note 8 मध्ये मागे चार कॅमेरे आहेत, ज्यात 64 मेगापिक्सलचा प्राइमरी + 2 मेगापिक्सल (4cm मॅक्रो) + 2 मेगापिक्सलचा डेप्थ + AI लेंस सह क्वाड एलईडी फ्लॅश आहे. तसेच फ्रंटला 16 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह पोर्टेट कॅमेरा देण्यात आला आहे. दुसरीकडे इनफिनिक्स नोट 8आय मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा + 2 मेगापिक्सल (4cm मॅक्रो) + 2 मेगापिक्सल (depth) + AI Lens आणि क्वाड एलईडी फ्लॅश आहे. फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

इनफिन्क्स नोट 8 आणि नोट 8आय मध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी80 12nm का प्रोसेसर आहे जो डुअल 2GHz कोर्टेक्स-A75 + Hexa 1.8GHz 6x कोर्टेक्स-A55 जीपीयू सह 950MHz ARM माली-G52 2EEMC2 जीपीयू सह येतो. तसेच इनफिनिक्स नोट 8 मध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. दुसरीकडे नोट 8आय मध्ये 4GB RAM + 64GB वेरिएंट, 4GB RAM + 128GB मॉडेल आणि 6GB RAM सह 128GB इंटरनल स्टोरेज आहे.

प्रोसेसर प्रमाणेच दोन्ही फोन मध्ये बॅटरी पण एक सारखी आहे. दोन्ही फोन मध्ये 5200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन्स XOS 7.1 बेस्ड अँड्रॉइड 10 वर चालतात. कनेक्टिविटी ऑप्शन्स पाहता दोन्ही फोन मध्ये डुअल 4G VoLTE, वाई-फाई 802.11 ac (2.4GHz + 5GHz), ब्लूटूथ 5, GPS / GLONASS / Beidou आणि USB टाइप- C पोर्ट सपोर्ट आहे.

किंमत

Infinix Note 8 ची किंमत जवळपास 200 डॉलर (जवळपास 14,700 रुपये) आहे. फोन डीपसीए लिस्टर, सिल्वर डायमन आणि आइसलँड फॅंटेसी कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. Infinix Note 8i ओब्सीडियन ब्लॅक, ट्रॅकिल्ल ब्लू आणि आइस डायमंड रंगात येतात. पण सध्या कंपनीने याच्या किंमतीचा खुलासा केला नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here