Vi ने सादर केले 8 नवीन रिचार्ज पॅक, मिळेल अनलिमिटेड टॉक टाइम

वोडाफोन आयडिया जेव्हा पासून एकत्र आलेत तेव्हापासून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन आणि शानदार प्लान सादर करत आहेत. आता Vi ने नवीन अनलिमिटेड टॉकटाइम ऍड-ऑन प्रीपेड पॅक्स लॉन्च केले आहेत. सादर केलेल्या 8 नवीन ऍड-ऑन पॅक्स मध्ये युजर्सना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. रिचार्ज मध्ये मिळणाऱ्या नवीन फायद्यांमध्ये स्टार टॉक, गेम्स, स्पोर्ट्स आणि कॉन्टेस्ट सारख्या बेनिफिट्सचा समावेश आहे. तसेच या प्लानची खासियत अशी आहे कि कंपनीने तर हे ऍड-ऑन कॅटेगरी मध्ये लिस्ट केले आहेत पण हे वॅलिडिटी सह येतात.

हे आहेत 8 प्लान्स

Vi ने 32 रुपये, 42 रुपये, 43 रुपये, 52 रुपये, 62 रुपये, 72 रुपये, 73 रुपये आणि 103 रुपयांचे रिचार्ज प्लान सादर केले आहेत. हे प्लान्स Vi च्या वेबसाइट वर लाइव करण्यात आले आहेत. तसेच या सर्व प्लान्स मध्ये मिळणारे बेनिफिट्स वेगवेगळे आहेत.

प्लान्स मध्ये मिळणारे लाभ

32 रुपयांच्या पॅक मध्ये गेम्स बेनिफिट सह अनलिमिटेड टॉक टाइम दिला जात आहे. तसेच या पॅकची वैधता 28 दिवस आहे. तसेच 42 रुपयांच्या पॅक मध्ये स्पोर्ट्स बेनफिट मिळतात आणि यात पण अनलिमिटेड टॉक टाइम आणि 28 दिवसांची वैधता मिळते.

43 रुपये आणि 52 रुपयांच्या पॅक मध्ये कंपनीकडून 28 दिवसांची वैधता मिळते. तसेच दोन्ही प्लान मध्ये अनलिमिटेड टाकटाइम पण दिला जातो. 43 रुपये कॉन्टेस्ट बेनिफिट आणि 52 रुपयांच्या प्लान मध्ये स्टार टॉक बेनिफिट मिळतात.

हे देखील वाचा : Jio, Airtel आणि Vodafone idea च्या या प्लान मध्ये मिळेल 50GB डेटा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

62 रुपये, 72 रुपये, 73 रुपये आणि 103 रुपयांच्या प्लान्सची वॅलिडिटी 89 दिवस आहे. तसेच या सर्व प्लान मध्ये अनलिमिटेड टॉक टाइम मिळतो. पण इतर बेनिफिट्स वेगळे आहेत. तसेच 62 रुपयांच्या पॅक मध्ये ‘गेम्स’, 72 रुपयांच्या पॅक ‘स्पोर्ट्स’ बेनिफिट मिळतात. 73 रुपयांच्या पॅक सह ‘Contest’ आणि 103 रुपयांच्या पॅक ‘Star Talk’ बेनिफिट मिळतात.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here