मित्राला घ्यायला सांगा Samsung का स्मार्टफोन आणि मिळवा 7500 रुपयांची बक्षीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भारतातील सर्वात विश्वसनीय स्मार्टफोन ब्रँड पैकी एक सॅमसंग इलेक्ट्रॉनिकने आज सॅमसंग स्मार्ट कॅफे आणि सॅमसंग स्मार्ट प्लाजा सोबतच सॅमसंग एक्सक्लूसिव स्टोर्स वरून गॅलेक्सी स्मार्टफोन विकत घेणाऱ्या ग्राहकांसाठी रोमांचक प्रोग्रामची घोषणा केली. नवीन प्रोग्राम त्या ग्राहकांसाठी फायदेशीर आहे जे सॅमसंग एक्सक्लूसिव स्टोर्स मध्ये गॅलेक्सी स्मार्टफोन विकत घेण्याची प्लानिंग करत आहेत. तसेच कंपनीने एक रेफरल प्रोग्राम पण सादर केला आहे, ज्याच्या मदतीने 7500 रुपयांपर्यंतचे गिफ्ट पण दिले जाईल.

स्मार्ट क्लब लॉयल्टी प्रोग्राम

या प्रोग्रामचा वापर करून, ग्राहक सॅमसंग स्मार्ट कॅफे किंवा सॅमसंग स्मार्ट प्लाजा वरून कमीत कमी 15,000 रुपयांच्या किंमतीच्या गॅलेक्सी स्मार्टफोनच्या पहिल्या खरेदीवर रिवॉर्ड पॉइंट्स, सर्विस कुपन आणि इतर आकर्षक लाभ मिळवू शकतात. हे रिवॉर्ड पॉइंट्स सॅमसंग एक्सक्लूसिव स्टोर्स वर नंतर खरेदी करण्यासाठी वापरता येतील. तसेच ग्राहकांना स्मार्ट क्लबची सदस्यता (डिसेंबर, 2020 पर्यंत वैध) आणि गॅलेक्सी झेड फोल्ड 2 आणि गॅलेक्सी टॅब एस7 सारख्या प्रोडक्ट वर फास्ट ट्रॅक अपग्रेड सह 6000 रुपयांपर्यंतचे तीन वाउचर मिळतील.

सॅमसंग रेफरल प्रोग्राम

सॅमसंगचा भारतात एक मोठा कंज्यूमर बेस आहे हे पाहता कंपनीने रेफरल प्रोग्राम सादर केला आहे. सॅमसंग वापरकर्ते त्यांच्या मित्र आणि कुटुंबाच्या सदस्यांनी सॅमसंग एक्सक्लूसिव स्टोर्सच्या माध्यमातून स्मार्टफोन विकत घेतल्यावर 7500 पर्यंतचे गिफ्ट मिळवू शकतात.

हे देखील वाचा : Jio चा सर्वात स्वस्त डेली 2GB डेटा असलेला प्लान, जाणून घ्या याबाबत सर्वकाही

WhatsApp चॅटबॉट

सॅमसंगने व्हाट्सऍप चॅटबोट लॉन्च केला आहे जो ग्राहकांना काही क्लिक सह जवळच्या सॅमसंग स्मार्ट कॅफेशी कनेक्ट करण्यास मदत करेल. सॅमसंग SmartCafé व्हाट्सऍप नंबर 9870-494949 वर “हाय” मेसेज पाठवून, ग्राहक जवळच्या सॅमसंग स्मार्टकॅफेच माहिती मिळवू शकतात, स्टोर मधून ऑनलाइन खरेदी करता येईल, होम डेमो बुक करू शकतात, स्टोर वरून कॉल बॅक मिळवू शकतात आणि नवीन ऑफर आणि प्रोडक्ट लॉन्च बाबत जाणून घेऊ शकतात. खरेदीनंतर, ग्राहक स्टोर वर एसएमएस पोस्ट बिलिंगच्या माध्यमातून शेयर केलेल्या “ऑप्ट इन” लिंकच्या माध्यमातून व्हाट्सऍप वर आपल्या व्यवहाराची एक इलेक्ट्रॉनिक स्लिप मिळवू शकतात.

व्हिडीओ

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here