Jio चा सर्वात स्वस्त डेली 2GB डेटा असलेला प्लान, जाणून घ्या याबाबत सर्वकाही

Photo by Ketut Subiyanto from Pexels

Reliance Jio अनेक दिवसांपासून भारतातील टेलीकॉम बाजारात टॉप पोजिशन वर कायम आहे. कंपनी या पोजिशन वर राहण्यासाठी वेळोवेळी असे रिचार्ज पॅक लॉन्च करते जे ग्राहकांना आकर्षित करतात. तसेच, कंपनीकडे रोज 2 जीबी डेटा देणारे अनेक किफायतशीर प्रीपेड प्लान आहेत. या प्लान्सची किंमत पाहता कंपनी 249 रुपयांपासून 2,599 रुपयांपर्यंत अनेक प्रीपेड प्लान ऑफर करते जे युजर्सना डेली 2जीबी डेटा देतात. आज आम्ही तुम्हाला जियोच्या डेली 2GB डेटा असलेल्या सर्वात किफायती प्लान म्हणजे 249 रुपयांच्या रिचार्ज पॅक बाबत बाबत माहिती देणार आहोत.

249 रुपयांचा जियो रिचार्ज प्लान पाहता यात युजर्सना संपूर्ण 28 दिवसांची वॅलिडिटी मिळते. तसेच या पॅक मध्ये रोज 2 जीबी डेटा मिळतो. म्हणजे एकूण 56 जीबी हाय-स्पीड डेटा दिला जातो. रोज मिळणार डेटा संपल्यावर स्पीड कमी होऊन 64Kbps होतो. याचा अर्थ असा आहे कि तुम्हाला अनलिमिटेड डेटाचा लाभ या प्लान मध्ये मिळेल.

हे देखील वाचा : लवकरच येत आहे दमदार Redmi Note 9T, वेबसाइट वर झाला लिस्ट

वॉइस कॉलिंगसाठी जियो नेटवर्क वर अनलिमिटेड तर नॉन-जियो नेटवर्क वर कॉलिंगसाठी 1000 FUP मिनट्स दिले जातात. तसेच ग्राहक रोज 100 एसएमएस मोफत पाठवू शकतात. तसेच जियो ऍप्सची मेंबरशिप पण फ्री मिळते.

अलीकडेच एक बातमी समोर आली होती, ज्यानुसार ट्रायने 8 टेलीकॉम कंपन्यांना एकूण 35 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यात BSNL, Reliance Jio, Airtel, VI म्हणजे Vodafone Idea, MTNL, Tata Teleservices, Videocon आणि Quadrant Teleservices सारख्या कंपन्यांची नावे आहेत.

हे देखील वाचा : 6 कॅमेरा आणि 6.85 इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च झाला 8 जीबी रॅम असलेला हा पावरफुल फोन, किंमत फक्त 14,999 रुपये

बातमीबद्दल सविस्तर सांगायचे झाले तर या कंपन्यांवर त्यांच्या नेटवर्कच्या त्या युजर्सची माहिती सायबर क्रिमिनल्सना वापरण्याची परवानगी दिली होती जे आपल्या फोन वर डिजिटल पेमेंट करण्यासाठी वॉलेट ऍप्सचा वापर करतात, असा आरोप आहे. हे डिटेल्स वापरून इंटरनेट वर फसवणूक करणाऱ्या लोकांनी मोबाईल युजर्सच्या नंबर वर फेक एसएमएस पाठवायला सुरवात केली होती, जे सायबर क्राईमच्या श्रेणीत येते. ट्रायनुसार या टेलिकॉम कंपन्यांनी टेलिकॉम कमर्शल कम्युनिकेशन कस्टमर प्रीफरेंस रेगुलेशनचे उल्लंघन केले आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here