भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी लावाने आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Lava BeU भारतात सादर केला आहे. हा फोन खासकरून महिलांसाठी डिजाइन केला गेला आहे. यात क्रिस्टल स्टड डेकोरेशन आणि फ्लोरल स्पीकर मॅशचे कॉम्बिनेशन मिळेल. तसेच या फोनच्या लॉन्च नंतर Lava ने आम्हाला माहिती दिली आहे कि कंपनी चार नवीन स्मार्टफोन पुढील महिन्यात 7 जानेवारीच्या आधी लॉन्च करणार आहे. या माहिती सोबतच स्वतः कंपनीने 91मोबाईल्सला सांगितले कि 4 फोन सह एक ऍक्सेसरी पण सादर केली जाईल. आशा आहे कि कंपनी ऍक्सेसरी म्हणून एक स्मार्ट बॅंड मार्केट मध्ये घेऊन येईल.
20 हजारांपेक्षा कमी असेल किंमत
काही रिपोर्ट्सनुसार कंपनी पुढच्या महिन्यात एका वर्चुअल इवेंट मध्ये आपले नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करण्याची तयारी करत आहे. पण याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही. किंमतीबाबत कंपनीने माहिती दिली आहे कि लॉन्च केले जाणाऱ्या 4 फोन्सची किंमत 20,000 पेक्षा कमी असेल.

चायनीज कंपन्यांना मिळेल आव्हान
जर लावा 20 हजार रुपयांच्या आत फोन्स सादर करण्याची योजना बनवत असेल तर स्पष्ट झाले आहे कि कंपनी शानदार फीचर्स असलेले फोन कमी किंमतीत देऊन शाओमी-रियलमी सारख्या चायनीज कंपन्यांना आव्हान देण्यासाठी तयार आहे. आता पर्यंत मार्केट मध्ये कंपनी बजेट कॅटेगरी मधेच फोन्स सादर करत आहे.
हे देखील वाचा : तुम्ही पण बघत आहात का भारतात PUBG येण्याची वाट, इथे जाणून घ्या कधी होईल रिलीज
ऑफलाइन सह ऑनलाइन होईल विक्री
नवीन लावा स्मार्टफोन कंपनी ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही माध्यमांतून खरेदीसाठी उपलब्ध करू शकते. ऑनलाइन मार्केट बद्दल बोलायचे तर सध्या भारतात Xiaomi, Vivo आणि Oppo सारख्या कंपन्यांचा कब्जा आहे. लावा बराच काळ ऑफलाइन मार्केट मध्ये डील करत आहे.
लावा बीयू स्मार्टफोन
Lava BeU चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात वॉटर-ड्रॉप नॉच 6.08-इंचाचा एचडी+ (720×1,560 पिक्सल) डिस्प्ले आहे जो 19.5:9 आस्पेक्ट रेश्यो वर काम करेल. तसेच फोनचा डिस्प्ले 2.5D कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड असेल. लावाने हा फोन 2GB RAM आणि 32GB स्टोरेज सह लॉन्च केला आहे. लावा बी यू मध्ये 1.6GHz octa core प्रोसेसर आहे जो IMG8322 GPU सह येतो.















