तुम्ही पण बघत आहात का भारतात PUBG येण्याची वाट, इथे जाणून घ्या कधी होईल रिलीज

भारतात एकेकाळी सर्वात लोकप्रिय मोबाईल गेम PUBG सध्या भारतात बॅन आहे. काही दिवसांपासून असे रिपोर्ट समोर येत आहेत कि कंपनी लवकरच पबजी मोबाईल भारतात पुन्हा घेऊन येणार आहे. परंतु PUBG Mobile India च्या लॉन्च मध्ये एकापाठोपाठ एक अडचणी येत आहेत. काही दिवसांपूर्वीच दोन RTI ना उत्तर देत MeitY ने भारतात PUBG ला कोणतीही परवानगी न दिल्याची माहिती देण्यात आली होती आणि आता एक नवीन रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि पबजी मोबाईल भारतात मार्चच्या आधी लॉन्च होणे कठीण आहे.

पबजी मोबाईल गेम कंपनीच्या एका अधिकाऱ्याने InsideSport ला दिलेल्या विधानात अशी माहिती दिली आहे कि पबजी भारतात मार्चच्या आधी येणार नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले कि PUBG कडून सर्व प्रयत्न केले गेले होते, पण परिस्थिती अशी आहे कि यात यश मिळत नाही.

भारतात बॅन झाल्यानंतर PUBG Corporation ने Tencent Games कडून PUBG Mobile चे सर्व अधिकार काढून घेतले होते आणि लोकल बदलांसह भारतसाठी खास PUBG Mobile India ची घोषणा केली. पण टीजर जारी केल्यानंतर पासून गेमच्या लॉन्च बद्दल कोणतीही डेट आतापर्यंत फाइनल केली गेली नाही.

हे देखील वाचा : OnePlus Nord SE बाबत सर्वात मोठा खुलासा, जाणून घ्या काय असेल या या फोन मध्ये खास

पबजी मोबाईल इंडियाच्या लॉन्चची माहिती देते कंपनीने सांगितले होते कि क्रॉफ्टन आणि पबजी कॉरपोरेशन कंपनी आपल्या नवीन मोबाईल गेम वर्जनसाठी भारतात 100 मिलियन यूएस डॉलरची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून कंपनी लोकल व्हिडीओ गेमिंग सोबतच आयटी इंडस्ट्री आणि इंटरटेनमेंटच्या व्यवसायात विस्तार करेल. PUBG MOBILE INDIA सह युजर्सची प्राइवेसी आणि सिक्योरिटीला पण कंपनीने प्राधान्य दिल्याचे सांगितले होते.

टेलीकॉम कंपनी सह होऊ शकते भागेदारी

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे रिपोर्ट्स मध्ये समोर आले आहेत कि PUBG भारतात कमबॅक करण्यासाठी टेलीकॉम कंपन्यांसोबत भागीदारी करू शकते. या कंपन्यांमध्ये Airtel आणि Reliance Jio ची नावे पण समोर आली होती. टेलिकॉम कंपन्यांची हि नावे फक्त अफवा असल्याचे बोलले जात आहे पण जर PUBG MOBILE INDIA ची एयरटेल किंवा जियो सोबत डील झाली तर यामुळे या कंपन्यांना पबजी मोबाईलच्या वितरणाचे अधिकार मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here