Samsung ने गेल्या वर्षी भारतीय बाजारात आपल्या नव्या ‘एफ सीरीज’ ची सुरवात केली होती, त्या अंतर्गत Samsung Galaxy F41 स्मार्टफोन लॉन्च केला होता. साल 2021 मध्ये सॅमसंग आपल्या या सीरीज मध्ये काही नवे आणि मोठे बदल करणार आहे आणि याची सुरवात कंपनी नव्या स्मार्टफोन Samsung Galaxy F62 पासून करेल. 91मोबाईल्सने काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव माहिती दिली होती की भारतातील नोएडा मधील सॅमसंग फॅक्ट्री मध्ये गॅलेक्सी एफ62 स्मार्टफोनची निर्मिती सुरू झाली आहे. तसेच आज आम्ही लॉन्चच्या आधी या स्मार्टफोनची खरी ‘पॅनल ईमेज’ पण घेऊन आलो आहोत.
Samsung Galaxy F62 ची निर्मिती कंपनीने सुरू केली आहे आणि या ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोनचे प्रोडक्शन नोएडा मध्ये होत आहे. 91मोबाईल्सला या फोनचे इन-प्रोडक्शन फोटोज मिळाले आहेत त्यात फोन मधील पॅनल दाखविण्यात आला आहे. या पॅनल वरून फोनच्या रियर कॅमेरा सेटअपच्या प्लेसमेंट सह 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप-सी सारख्या पोर्ट्स तसेच साईड बटन्सच्या प्लेसमेंटची माहिती पण मिळाली आहे.
क्वॉड रियर कॅमेर्यासह होईल लॉन्च
कंपनीने आतापर्यंत सॅमसंग गॅलेक्सी एम62 स्मार्टफोनच्या लॉन्च आणि याच्या स्पेसिफिकेशन्स संबंधित माहिती दिली नाही पण 91मोबाईल्सला मिळालेल्या पॅनल फोटो वरून स्पष्ट झाले आहे की हा स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेर्याला सपोर्ट करेल. फोनच्या रियर कॅमेरा सेटअप पॅनल वर डावीकडे चौकोनी आकारात दिला जाईल. बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाणार नाही त्यामुळे हा पावर बटन इम्बेडेड किंवा इन-डिस्प्ले सेंसर सह येऊ शकतो.
Samsung Galaxy F62 काही दिवसांपूर्वी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला आहे. या लिस्टिंगनुसार गॅलेक्सी एफ62 मध्ये Samsung आपला Exynos 9825 चिपसेट देईल. तसेच डिवाइस मध्ये 6GB रॅम आणि एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम दिली जाईल. Samsung Galaxy F62 च्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशन बाबत सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. पण नवीन अपडेट येताच वाचकांना त्याची माहिती दिली जाईल.

















